
पुणे, १ ऑगस्टः पुणे जिल्हा फुटबॉल संघटने (पीडीएफए) तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम आणि व्दितीय श्रेणी गटात चेतक एफसी, इंद्रायणी एफसी, गनर्स एफसी, बोपोडी क्लब, स्पोर्टस् मेनिया, साई फुटबॉल ॲकॅडमी आणि दुर्गा ॲकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
बावधन येथील हॉटफुट फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये चेतक एफसी अ संघाने दिएगो ज्युनिअर्स संघाचा ३-१ असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये प्रमोद आत्रे याने दोन गोल तर, सुजित भोकरे याने एक गोल केला. दुसऱ्या सामन्यामध्ये इंद्रायणी संघाने रिअल पुणे युनायटेड संघाचा ३-१ असा पराभव केला. मकरंद हरदेव याने दोन गोल तर, रोहील भोकरे याने एक गोल केला. जयंत जाधव याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर गनर्स एफसी संघाने डेक्कन इलेव्हन अ संघाचा १-० असा पराभव केला.
व्दितीय श्रेणी गटामध्ये अव्वल आठ संघांची गटसाखळी फेरी सुरू झाली. बोपोडी एलएफए क्लब संघाने खडकी ब्ल्युज् संघाचा २-१ असा पराभव केला. बोपोडी संघाकडून रॉनी रोझारीयो आणि अर्थव निगडे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. स्पोर्टस् मेनिया संघाने डायनामाईट्स संघाचा ५-१ असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये नील सुदर्शन याने चार गोल नोंदविले तर, अविनाश चांदवरकर याने एक गोल केला. विनय भावसार आणि कार्तिक बोंडे यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर साई फुटबॉल ॲकॅडमीने एफसी शिवनेरी संघाचा २-१ असा सहज पराभव केला. दुर्गा ॲकॅडमीने उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड ब संघाचा ३-१ असा पराभव केला. नीरज माने याने दोन गोल तर, मयुर वाघिरे याने एक गोल केला.
सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः अव्वल (सुपर) श्रेणी गटः
१) चेतक एफसी अः ३ (प्रमोद आत्रे २०, ७८ मि., सुजित भोकरे ५० मि.) वि.वि. दिएगो ज्युनिअर्स अः १ (अभिजीत जाधव ८२ मि.); पुर्वार्धः १-०;
२) इंद्रायणी अः ३ (मकरंद हरदेव १८, ४५+२ मि., रोहील भोकरे ५५ मि.) वि.वि. रिअल पुणे युनायटेडः १ (अंकित देवी ८२ मि.); पुर्वार्धः २-०;
३) गनर्सः १ (जयंत जाधव ३२ मि.) वि.वि. डेक्कन इलेव्हन अः ०; पुर्वार्धः १-०;
व्दितीय श्रेणी गटः सुपर ८ ग्रुपः गटसाखळी फेरीः
१) बोपोडी एलएफए क्लबः २ (रॉनी रोझारीयो ५४ मि., अर्थव निगडे ७८ मि.) वि.वि. खडकी ब्ल्युज्ः १ (अथर्व कुसाळकर १८ मि.); पुर्वार्धः ०-१;
२) स्पोर्टस् मेनियाः ५ (अविनाश चांदवरकर २९ मि., नील सुदर्शन ३१, ५९, ८०, ८६ मि.) वि.वि. डायनामाईट्सः १ (रोहन भंडारे ९०+१ मि.); पुर्वार्धः २-०;
३) साई फुटबॉल ॲकॅडमीः २ (विनय भावसार ३४ मि., कार्तिक बोंडे ५४ मि.) वि.वि. एफसी शिवनेरीः १ (राजेश पवार ९०+२ मि.); पुर्वार्धः १-०;
४) दुर्गा ॲकॅडमीः ३ (नीरज माने २५, ३४ मि., मयुर वाघिरे ७१ मि.) वि.वि. उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड बः १ (हेमंत रावत ५५ मि.); पुर्वार्धः २-०