मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आळंदीत रक्तदान
माऊली मंदिरात श्रींची पूजा ; चलपादुका अभिषेख

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सकल मराठा समाज आळंदी पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास आळंदी ग्रामस्थ, आळंदी पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फुरद प्रतिसाद दिला.
तत्पूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे वैभवी चलपादुका पूजा, अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, अर्जुन मेदनकर, अरुण कुरे, शशिकांतराजे जाधव, भागवत शेजूळ, सुहास सावंत, सोमनाथ काळे उपस्थित होते. यावेळी श्रींचे पूजेचे पौरोहित्य प्रफुल्ल प्रसादे यांनी केले.
आळंदीत आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे १२९ वर रक्तदात्यांनी रक्तदान करीत शिबीर यशस्वी केले. सामाजिक भावनेतून रक्तदात्यास भेट वस्तू देऊन सन्मानित करीत अल्पोपहार देण्यात आला.
राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातून सर्व स्तरातील मान्यवरांनी यास प्रतिसाद दिला. ज्ञानदर्शन धर्मशाळा आणि बालाजी रक्तपेढीचे वतीने रक्त संकलन करण्यास परिश्रम घेतले. सकाळ मराठा समाज आळंदी सह पंचक्रोशी ग्रामस्थ समाज बांधव यांचे वतीने यावेळी आभार मानण्यात आले. सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन समाज बांधवांचे वतीने सन्मानित करण्यात आले. सकल मराठा समाज आळंदी, मराठा सेवकांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, जालिंदर महाराज भोसले, जयसिंग कदम, रोहिदास कदम, भागवत शेजूळ, अरुण कुरे, सोमनाथ काळे, सुहास सावंत, बालाजी शिंदे, श्रीकांत काकडे, शशिकांराजे जाधव आदींनी परिश्रम घेतले.