मराठी
ग्रामीण विद्यार्थ्यांना ड्रोन उडविणे प्रशिक्षण वर्ग संपन्न.

पुणे : लिडो इंडिया सोल्युशन आणि ओबियंटस्टेपझ यांच्या संयुक्त विद्यमाने सयाजीनाथ महाराज विद्यालय आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रोन उडविणे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब नॉर्थचे अध्यक्ष मोहन पुजारी, दीप्ती पुजारी,सारंग बालंखे,हेमंत पुराणिक, ओबियंटस्टेपझचे संस्थापक मिलिंद जाधव,आणि टीम मधील राजेश अंबिके, शुभम गिरी, अनिता,मुख्याध्यापक राजकुमार गायकवाड, आणि शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी मिलिंद जाधव यांनी सांगितले की ड्रोन क्षेत्रात शिक्षण, व्यावसायिक कारकिर्दीत भरपूर संधी उपलब्ध आहेत. याचे हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.