मराठी
खो. न. पा. च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात स्तनपान सप्ताह साजरा

खोपोली (रायगड) दि. ०५.०८.२०२५ रोजी खोपोली नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात “स्तनपान सप्ताह” साजरा करण्यात आला.
या वेळी MGM महाविद्यालय कामोठे येथील इंटर्न डॉ यांनी स्तनपान या विषयी १५ मिनिटाचे नाटक सादर केले व MGM च्या कुलकर्णी मॅम यांनी व नगरपरिषदेच्या डॉ संगीता ठाकूर-वानखेडे यांनी स्तनपान विषयी सविस्तर माहिती उपस्थित गरोदरमाता व इतर सर्व रुग्णांना दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषदेचे मा मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांचे मार्गदर्शनाने व एमजीएम कामोठे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोगतज्ञ डॉ सुनीला मॅम व त्यांचे सहकारी डॉ, शितल सिस्टर , विक्रांत यांचे सहकार्याने तसेच इनरव्हील क्लब खोपोली यांचे सहकार्याने सर्व गरोदर मातांना राजगिरा लाडू व फळे वाटप करून कार्यक्रम यशस्वी करणेत आला.
इनरव्हील क्लब खोपोलीच्या अध्यक्षा सौ दिना नलिन शहा, सेक्रेटरी सौ मधुमिता संजय पाटील, माजी अध्यक्षा जयश्रीताई कलोशी,सदस्य रमीला पटेल व नगरपरिषदेच्या डॉ प्रियंका वरचाली, इंचार्ज सिस्टर तायडे-कोजगे, सिस्टर गिरी, सिस्टर प्रांजल, शुभांगी, श्वेता, योगेश म्हसे, ऋतुजा फॉर्मासिस्ट, मदतनीस लतिकताई व स्वप्नील,सागर आदी उपस्थित होते.