पाचवी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
टायटन बुल्स्, मास्टर्स क्लब संघांची विजयी कामगिरी !!

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रदीप डोंगरे याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टायटन बुल्स् संघाने रायझिंग चॅम्पियन्स् संघाचा १८३ धावांनी सहज पराभव करून दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टायटन बुल्स् संघाने २४७ धावांचा डोंगर उभा केला. संतोषकुमार सांगळे याने ८१ धावांची खेळी केली. याशिवाय सिद्धेश जी. (४९ धावा), सुनिल यादव (४२ धावा) आणि संदीप मोर्य (४० धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना रायझिंग चॅम्पियन्स् संघाचा डाव ६४ धावांवर आटोपला. प्रदीप डोंगरे याने २१ धावांमध्ये ५ गडी टिपले. त्याला दुसऱ्या बाजुने अमित भारव्दाज याने २१ धावांमध्ये ४ गडी बाद करून उत्तम साथ दिली आणि संघाचा विजय साकार केला.
नचिकेत कुलकर्णी याने केलेल्या अचूक कामगिरीच्या जोरावर मास्टर्स क्लबने कल्याण क्लबचा ४ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद केली. कल्याण क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकामध्ये १७९ धावांचे आव्हान उभे केले. अमर खेडेकर याने ५७ धावांची आणि चिराग शेरकर याने ३६ धावांची खेळी केली. अनिकेत ए. आणि फर्श अन्सारी या मास्टर्सच्या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य मास्टर्स क्लबने १५.१ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. नचिकेत कुलकर्णी याने २६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. अमोल करामपुरी (४२ धावा) आणि रोहन देशमुख (नाबाद ३३ धावा) यांनीसुद्धा धावांचे योगदान देत संघाचा विजय निश्चित केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
टायटन बुल्स्ः २० षटकात ४ गडी बाद २४७ धावा (संतोषकुमार सांगळे ८१ (४५, ८ चौकार, ४ षटकार), सिद्धेश जी. ४९, सुनिल यादव ४२, संदीप मोर्य ४०, शुभांकर विश्वकर्मा २-३२) वि.वि. रायझिंग चॅम्पियन्स्ः ११ षटकात १० गडी बाद ६४ धावा (आकाश ठक्कर १४, अक्षय गोरे नाबाद १८, प्रदीप डोंगरे ५-२१, अमित भारव्दाज ४-२१); सामनावीरः प्रदीप डोंगरे;
कल्याण क्लबः २० षटकात ७ गडी बाद १७९ धावा (अमर खेडेकर ५७ (३७, ३ चौकार, ५ षटकार), चिराग शेरकर ३६, अनिकेत ए. २-३१, फर्श अन्सारी २-३९) पराभूत वि. मास्टर्स क्लबः १५.१ षटकात ६ गडी बाद १८० धावा (नचिकेत कुलकर्णी ६१ (२६, ७ चौकार, ४ षटकार), अमोल करामपुरी ४२, रोहन देशमुख नाबाद ३३, राघव खेडकर २-१३); सामनावीरः नचिकेत कुलकर्णी;