देहूतील प्राचीन सिद्धेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

पिंपरी चिंचवड : (बद्रीनारायण घुगे ):श्रावण शुध्द चतुर्थी पवित्र अशा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त देहूतील पवित्र इंद्रायणी तीरी प्राचिन असलेल्या सिद्धेश्वर मंदिर तर मुख्य मंदिरातील रेश्वर शिवलिंगाचे भाविक भक्तांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.या ठिकाणी श्रावणी सोमवार निमित्त रात्रभर भजन ,हरिपाठ तसेच हरीचा जागर ,तर सोमवारी सकाळी पासूनच अनेक महिला भजनी मंडळांची भजनसेवा झाली.नमो शिवाय ,ओम नमो शिवाय , हर हर महादेव ,नमो शिवाय.नामोच्चाराने सिद्धवश्वर मंदिर व परिसरात भक्तिमय असे वातावरण निर्माण झाले होते.मंदिराला व आतील गाभार्यास विविध पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.या आशा भक्तिमय वातावरणात तास न तास रांगेत उभे राहून भाविक भक्तानी या प्राचीन शिव लिंगास दही दूध आशा पंचामृताने दुग्ध अभिषेक घालून ,बेल पत्र वाहून मनोभावे दर्शन घेतले.देहूगाव व पंचक्रोशीतील शिव भक्तांनी दर्शन घेतले.
*धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव।तेथे नांदे देव पांडुरंग।धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे उच्चारती वाचे नाम घोष।कर कटी उभा विश्वाचा जनिता।वामांगी ते माता रखुमादेवी।गरुड पारी उभा जोडोनिया कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ।दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर ।शोभे गंगातीर इंद्रायणी। लक्ष्मी नारायण बल्लाळाचे वन।तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर। विग्नराज द्वारी बहिरव बाहेर।हनुमंत शेजारी सहित दोघे। तेथे दास तुका करितो किर्तन ।हृदयी चरण विठोबाचे।*
या संत तुकोबारायांच्या अभंगावातील उच्चरा प्रमाणे संत तुकोबांच्या आधीपासून हे सिद्धेश्वर मंदिर असून ते प्राचीन असल्याचे या अभंगातून स्पष्ट होत आहे.विश्वाचा तारण करता ,जगाला नांदवणारा साक्षात पांडुरंग या देहूत नांदला.त्यामुळे धन्य झालेल्या या पुण्य भूमीत हे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.याच मंदिराच्या शेजारी बल्लाळाचे वन आहे ,जिथे संत तुकोबाराया कीर्तन करत असत ,निवांत बसत असत.म्हणूनच संत तुकोबांच्या अभंगात या प्राचिन सिद्धेश्वर लिंग मंदिराचा आणि मुख्य मंदिरात असलेल्या हरेश्वर मंदिराचा उल्लेख उल्लेख केलेला दिसून येतो.
पवित्र आशा धन्य देहूगावच्या भूमीत असलेल्या या प्राचीन सिद्धेश्वर व हरेश्वर मंदिरात असलेल्या शिव लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देहूगाव व पंचक्रोशीतील शिव भक्त दर्शनासाठी येत असतात.अगदी पहाटे पासून ते रात्री उशिरा पर्यंत रांगेत उभे राहून दर्भसनाच लाभ घेतात.या ठिकाणी सोमवारी रात्रभर भजनाचे कार्यक्रम होत असतात.एकूणच श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने शिव भक्तांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.