आलंदीजीवन शैलीधर्मब्रेकिंग न्यूज़शहर

कारगिल विजय दिनी अजिंक्य डी वाय पाटील महाविद्यालय तर्फे ग्रामीण रुग्णालय आळंदीत वृक्षारोपण

आळंदीत देशभक्तीमय उत्साहात वृक्ष बाईक रॅली ; वृक्षारोपण 

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कारगिल विजय दिवस भारतीय सैन्याच्या असीम शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची आठवण करून देणारा दिवस. अगदी प्रतिकूल परिस्थितीत लढून भारत मातेच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या निमित्त आळंदी मंदिरासह परिसरात कारगिल विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आले.

या उपक्रमांचे आयोजन अजिंक्य डी वाय पाटील समूह लोहगाव संचलित अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग राष्ट्रीय सेवा योजना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स विभाग, आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे वृक्ष लागवड व प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. कारगिल युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व कारगिल विजय दिनाच्या या पवित्र प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागातर्फे कारगिल विजय दिनाची औचित्य साधून “एक पेड मां के नाम” या उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय आळंदी देवाची येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नागरिक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सहभागी होऊन आळंदी केळगाव सिद्धबेट येथून वृक्ष बाईक रॅली वृक्ष हातात घेत पुढे तिरंगा ध्वज घेत काढली. वृक्ष बाईक रॅली गोपाळपूर, चाकण चौक, भैरवनाथ चौक, मरकळ रस्ता मार्गे आळंदी पोलीस स्टेशन समोरून आळंदी ग्रामीण रुग्णालय येथे देशभक्तीमय उत्साहात आली. विविध देशी फळझाडांची व नैसर्गिक पद्धतीने वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडी सोबतच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता करून प्लास्टिक मुक्त अभियानाचा संदेश दिला.

आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे संचालक माजी विरोधी पक्ष गटनेते डी. डी. भोसले पाटील यांचेसह उपस्थित मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग प्रा. दिलीप बाळासाहेब घुले आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर, विश्वस्त रामदास दाभाडे, रोहिदास कदम, कैवल्य टोपे, सुहास सावंत, आळंदी नगरपरिषद शहर समन्वयक शशांक कदम, उद्धव मते यांचेसह महाविद्यालयीन युवक, युवती ग्रामीण रुग्णालय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी यावेळी उपक्रमास प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेस राष्ट्रीय सेवा योजना अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग मधील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी तिरंगा रॅली व वृक्ष दिंडीचे आळंदी पंचक्रोशीत वृक्ष संवर्धन प्रभात फेरीचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समाजपयोगी कार्यासाठी शुभेच्छा देताना पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले.

रुग्णालय परिसरात विविध फळझाडे, औषधी वनस्पती आणि छायादायक झाडांची लागवड करण्यात आली. कारगिल विजय दिना निमित्त शहीद जवानांच्या स्मृतीला मानवंदना अर्पण करण्यासह पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे सामाजिक बांधिलकीतून आयोजन करण्यात आले. कारगिल मधील शूरवीरांचे बलिदान स्मरणात ठेवून आपण पर्यावरणासाठी सकारात्मक पावले उचलणे ही काळाची गरज ओळखून या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.

आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे सूचना, मार्गदर्शनात कार्यक्रमाचे संयोजन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी दिलीप घुले, डॉ. भाग्यश्री ढाकुलकर यांनी केले. उपक्रम यशस्वीतेस प्राचार्य डॉ एफ बी सय्यद, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्या मार्गदर्शनात डॉ. भाग्यश्री ढाकुलकर, प्राध्यापक दिलीप घुले आदींनी परिश्रम घेतले. समारोप शिवभक्त कैवल्य टोपे यांनी शिववंदना नेतृत्व करीत शिव वंदना घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!