पुनीत बालन ग्रुप आणि पायल तिवारी बिटिया फाऊंडेशन आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल चे स्क्रिनिंग उत्साहात संपन्न.

पुणे,– आज पुनीत बालन ग्रुप आणि पायल तिवारी बिटिया फाऊंडेशन वतीने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे स्क्रिनिंग मौलाना अबुल कलाम हॉल , कोरेगाव पार्क येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या फेस्टिव्हलसाठी एकूण ३०० चित्रपट आले होते. त्यापैकी प्राथमिक निवड प्रक्रियेतून मान्यवर परीक्षक मंडळाने विविध विषया वरील १३० चित्रपटाची पुढील फेरीसाठी निवड केली. त्यातून २५ उत्कृष्ट चित्रपट अंतिम फेरीत पोहोचले.

मान्यवर परीक्षक मंडळाने या अंतिम फेरीतील चित्रपटांचे परीक्षण करून विविध श्रेणींमध्ये १७ विजेते निश्चित केले आहेत. या विजेत्यांना १४ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या भव्य पारितोषिक वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
लघुपट परीक्षक मंडळात
मा. सेन दाभोळकर
प्रोडूसर डायरेक्टर
मा. सचिन दानाई
प्रोडूसर डायरेक्टर ऍक्टर मॉडेल
मा. विशाल गोरे
प्रोडूसर डायरेक्टर ऍक्टर मॉडेल
मा. झहीर दरबार.
प्रोड्यूसर म्युझिशियन हे होते.
हा फेस्टिव्हल नवोदित दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तरुणाईला त्यांची सर्जनशीलता आणि प्रतिभा सादर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देतो. पुनीत बालन ग्रुप आणि
पायल तिवारी बिटिया फौंडेशन आयोजित शॉर्ट फील्म फेस्टीव्हल पारितोषिक वितरण सोहळा दि. १४ ऑगस्ट २०२५ वार गुरवार रोजी दुपारी १२ — ०० वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडैशन हॉल , गांजवे चौक नवी पेठ पत्रकार भवन जवळ येथे होणार आहे असे मुख्य संयोजिका संगिता तिवारी यांनी या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे



