मराठी

या आधुनिक काळात प्रत्येकाने प्रपंचासोबत परिवारातील  सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने केले तरच मानवता धर्म टिकेल – सत्यशोधक रघुनाथ ढोक

फुले एज्युकेशन तर्फे प्रथमच भैरवनाथवाडी मध्ये 15 वा वास्तू सोहळा सत्यशोधक पद्धतीने संपन्न !!!

Spread the love

पंढरपूर – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे भैरवनाथ वाडी,पंढरपूर येथील श्रीमती द्वारकाबाई कुंडलिक देवकते यांच्या द्वारका निवास बंगल्याची महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सत्यशोधक गृहप्रवेश व वास्तू पूजन सोहळा रविवार   दि.3 ऑगस्ट 25 रोजी दुपारी 1 वाजता  शानदार पणे प्रबोधन करीत मोफत संपन्न झाला. ह्या सोहळ्याचे विधीकार्य या संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले साहित्य साधने चरित्र व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पार पाडीत आयोजक श्रीमती द्वारकाबाई आणि सत्यशोधक मृणाल व नवनाथ देवकते यांना जेष्ठ समाजसेवक मोहन काळे ,गोरक्ष देवकते आणि सत्यशोधक ढोक यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले फोटोफ्रेम आणि सत्यशोधक वास्तू सोहळा पार पाडला म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देण्यात आले.

या प्रसंगी सत्यशोधक ढोक यांनी प्रबोधन करताना प्रतिपादन केले की आजची पीढी शिक्षित व उच्चशिक्षित आहे तरी देखील वास्तव परिस्थिती समजून देखील फक्त आणि फक्त आपल्या  घर प्रपंच मध्ये जास्त गुंतलेले आढळत आहेत.या बद्दल खेद व्यक्त करीत थोर संत महापूर्षाने केलेले अलौकिक कार्य त्यांचे विचार ,वारसा पुढे नेण्यासाठी या शिक्षित लोकांनी पुढे येणे काळाची गरज आहे .तरच आपला अज्ञान बहुजन समाज अंधश्रद्धा कर्मकांड,आणि विशिष्ठ भटजीच्या फवणूकीतून प्रा.नवनाथ देवकते परीवारासारखे बाहेर पडेल. या आधुनिक काळात प्रत्येकाने प्रपंचासोबत परिवारातील  सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने केले तरच मानवता धर्म टिकेल व अंधश्रद्धा ,कर्मकांड मुहूर्त या गोष्टीला तिलांजली दिली जाईल असे देखील ढोक म्हणाले

या कार्यक्रमाच्या सुरवातीला मातोश्री द्वारकाबाई यांचे शुभहस्ते द्वारकानिवासाच्या मुख्य दरवाजाला भव्य पुष्पहाराचे तोरण बांधून फुलांच्या पायघड्यावरून सर्वांनी आगमन करीत प्रा.नवनाथ आणि मृणाल देवकते यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास भव्य पुष्पहार घालण्यात आले

प्रमुख उपस्थितीत मान्यवर अॅड.चंद्रकांत बनसोडे प्रा,प्रवीण व स्वाती सरोदे,सौ.मोहिनी व मोहन काळे ,डॉ.बिभसेन रणदिवे ,सरपंच नारायण देशमुख, मा.पं.समिती सद्श्य औदुंबर मेटकरी ,प्राचार्य सुभाषराव माने आणि मातोश्री सरूबाई माने ज्यू.कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष अॅड.वामनराव माने आणि शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान ,महात्मा जोतीराव व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता व इतर ग्रंथाची पुजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित लेखक रघुनाथ ढोक यांचे  105 सावित्रीबाई फुले ग्रंथ सर्व मान्यवरांना व  महिलांना भेट देण्यात आले . तसेच सहकारी मित्र  बंधु , नातेवाईक यांनी देखील देवकते परिवारास ग्रंथ ,विठ्ठल रुक्मिणी मुर्त्या,भव्य फोटो तसेच फेटे हार घालून सत्यशोधक पद्धतीने विधीकार्य पार पाडले म्हणून मोठे कौतुक करीत गौरव पर भाषणे देखील अनेक मान्यवरांनी केली.

या प्रसंगी  देवकते परिवारा तर्फे अंगणात 5 फळझाडे लावून ज्या ज्या कामगारांनी द्वारकानिवास बांधण्यासाठी काम केले त्या सर्वांचे शाल श्रीफळ पुष्पहार घालून त्यांना  भेटवस्तू देण्यात आले. सर्वाना सुरुची भोजन देत पानसुपारी वाटण्यात आली. यापुढे याच पद्धतीने कार्य पार पाडू या म्हणा पाडले पाहिजे असे देखील सर्वांमध्ये चर्चा रंगली होती. स्वागत व प्रास्ताविक आयोजक सत्यशोधक प्रा.नवनाथ देवकते यांनी सत्याचा अखंड,उदेशिका वाचन केले तर आभार सत्यशोधिका मृणाल देवकते यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!