कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज मान्यवर दिले- ना. मुरलीधर मोहोळ
सामजाची गरज ओळखूनच उपक्रम आखणं ही मोदीजींची शिकवण- ना. चंद्रकांतदादा पाटील
आंतरसोसयटी एकांकीका स्पर्धेसारखे उपक्रम हे केवळ कोथरुडमध्येच शक्य- प्रशांत दामले
Pune.कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकारच आहेत, अशी भावना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. तर समाजाची गरज ओळखून उपक्रम आखणं ही मोदीजींची शिकवण आहे, अशी भूमिका नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेसारखे उपक्रम हे केवळ पुण्यात आणि कोथरुडमध्येच होऊ शकतात, असे कौतुकोग्दार प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड विधानसभा मतदारसंघात आयोजित आंतर सोसायटी एकांकीका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आज येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. सदीप बुटाला, कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, स्पर्धेचे परिक्षक यशोधन बाळ, भालचंद्र करंदीकर, अनुराधा राजहंस, संयोजक मधुरा वैशंपायन, अशुतोष वैशंपायन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सर्वसामान्यपणे लोकप्रतिनीधी निवडताना आपण सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणाऱ्या व्यक्तीला निवडून देत असतो. मात्र, चंद्रकांतदादा पाटील हे केवळ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवत नाहीत, तर मर्यादेच्या पलिकडे जाऊन काम करतात, ही त्यांची खासियत आहे. कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकार आणि दर्दी आहेत, हे सांगण्याची गरज नाही. आंतर सोसायटीला मिळालेला उत्सफूर्त प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, समाजाची गरज ओळखून कार्यक्रम आखणं ही माननीय मोदीजींची शिकवण आहे. ते मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्या माध्यमातून कर्णवतीमध्ये अनेक मुलांचे मोफत शिक्षण होत आहे. स्वामी विवेकानंद आणि जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देखील समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुखी समाधानी करण्यासाठी काम केलं पाहिजे, ही शिकवण दिली. त्यातूनच आदर्श घेऊन, कोथरुड विधासभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आंतर सोसायटी एकांकीका स्पर्धा ही त्यांपैकीच एक असल्याची भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, हौशी गायकांसाठी सप्टेंबर मध्ये वेगळी स्पर्धा घेण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही एकांकिका स्पर्धेचे मुक्तकंठाने कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपले आत्मपरिक्षण केल्यास, त्याला त्याच्यातील कलेची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. कोथरुडमध्ये नाटकाचे प्रयोग यशस्वी का होतात, हे आज मला स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमामुळे लक्षात आलं. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला आंतरसोसयटी एकांकिका स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, अशा प्रकारचा उपक्रम केवळ कोथरुडमध्येच शक्य आहे, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोथरुडच्या इंद्रधनू सोसायटीने सादर केलेल्या ‘पापक्षालन’ या एकांकीकेने पहिले पारितोषिक पटकावले. तर सूस-पाषाण येथील कृष्ण-कमल सोसायटीची ‘मळभ’ एकांकिका आणि बाणेरच्या नंदन प्रॉसपेराने सादर केलेल्या हिप्पोपोटेमसचे पोस्टमार्टमला द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले. तिसरं पारितोषिक देखील सृष्टी सोसायटीच्या ‘गुलाबी सिर’, बळवंत पूरम साम्राज्य ‘द कॉन्शन्स’ला विभागून देण्यात आले.



