मराठी
Your blog category
-
नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’!
मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा साधणार आहे. महाराष्ट्राने तलवारीच्या बळावर जगाला काबीज केलं आणि भक्तीच्या मार्गाने जगाला दिशा दाखवली. महाराष्ट्राच्या ह्या जडणघडणीत वारकरी संतांचा मोठा हातभार आहे. संतांचे विचार त्यांच्या अभंगातून कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झाले. त्यामुळे ह्या मातीत एकापेक्षा एक कीर्तनकार निर्माण झाले. कीर्तनकारांची ही भव्य परंपरा समृद्ध करण्यासाठी सोनी मराठीवर सुरु होतंय अद्भुत शोधपर्व ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’. या रिअॅलिटी शोच्या शीर्षकगीतानं शोची उत्सुकता आधीच वाढवली आहे. रिअॅलिटी शो म्हटलं की परीक्षकांविषयी उत्सुकता असते. त्यातही कीर्तनासारखा आगळावेगळा रिअॅलिटी शो म्हटल्यावर त्यातल्या परीक्षकांविषयी चर्चा नि उत्सुकता थोडी अधिकच आहे. ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून १०८ कीर्तनकार सोनी मराठीने शोधून आणले आहेत. प्रत्येक भागात त्यापैकी 3 कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर करतील. ह्या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठीने संप्रदायातील या दोन दिग्गज कीर्तनकार हभप जगन्नाथ महाराज पाटील आणि हभप राधाताई महाराज सानप ह्यांच्यावर सोपविली आहे. अत्यंत अभ्यासू कीर्तनकार ह.भ.प. राधाताई सानप या कर्तृत्वान आणि प्रतिभावान असून त्या सांप्रदायिक कीर्तनं, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबंदी अशा शैक्षणिक, सामाजिक व इतर विषयांवर प्रबोधन करून समाजजागृतीचं काम करतात. ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. भक्ती अन् मनोरंजन यांचा अनोखा मिलाफ साधत अभ्यास, बोलण्याची प्रभावी शैली, ग्रामीण भाषेचा लहेजा, हजरजबाबीपणा यांमुळे महाराष्ट्रभरात त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांना भाविक आवर्जून उपस्थित राहतात. वर्तमानातल्या घडामोडींचा संदर्भ देऊन सद्य परिस्थितीविषयी मार्मिक भाष्य करत आपल्या निरुपणातून अंजन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य करणारे हे दोन परीक्षक कार्यक्रमात उदयोन्मुख कीर्तनकारांना मार्गदर्शन करणार आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यासाठीच्या ऑडिशन्स नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी या ऑडिशन्सना भरघोस प्रतिसाद दिला. या कीर्तनकारांना पैलू पाडण्याचं कार्य परीक्षक पार पाडणार आहेत. या कीर्तनकारांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कीर्तनप्रवासाचे साक्षीदार होण्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे असं परीक्षक सांगतात. परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उदयोन्मुख कीर्तनकारांना नवी दिशा मिळेलच पण प्रेक्षकांना देखील कीर्तन म्हणजे काय.. ते कसं असावं.. कसं पहावं.. याबद्दलची मूळ माहिती घरबसल्या मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांवर सुसंस्करण घडावे याकरिता असे कार्यक्रम खरोखरीच मदतशील ठरतात. केवळ लहानगेच नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा कार्क्रम भावेल यात काहीच शंकाच नाही. चला मग विठ्ठलाच्या साक्षीने सुरु करूया हे अद्भुत शोधपर्व…’कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवा रिअॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठीवर पहायला विसरू नका.
Read More » -
कोटक म्यूचुअल फंड प्रस्तुत करत आहे छोटी SIP – तुमच्या स्वप्नांसाठी आयोजन करण्याचा एक छोटासा मार्ग
मुंबई, : कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (“KMAMC” / ‘कोटक म्यूचुअल फंड”) ने आज “छोटी SIP” सुविधा लॉन्च केल्याचे जाहीर केले. छोटी SIP कोटक…
Read More » -
मलाबार गोल्ड एंड डायमंड्स मार्च 2025 में 12 नए शोरूम खोलेगा
पुणे, : दुनिया का छठा सबसे बड़े आभूषण विक्रेता (ज्वेलर) मलाबार गोल्ड एंड डायमंड्स भारत में अपनी मौजूदगी को और मजबूत करने के…
Read More » -
आळंदी शहरात नियमित पाणी पुरवठ्या उपाय योजना करा – दिनेश घुले
आळंदी. येथील आळंदी नगरपरिषद शहरास पिण्याचे पाणी पुरवठा करीत असून भामा आसखेड कुरुळी टँपिंग मधून आळंदीस मंजूर १० एम.एल.डी कोठ्यातून…
Read More » -
वासंती देव, मनीषा पवार यांना स्नेहाधार गौरव पुरस्कार
पुणे : स्नेहालय, अहिल्यानगर संचलित स्नेहाधार पुणे परिवारातर्फे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवार, दि. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता निवारा सभागृह, नवी पेठ येथे होणार आहे. पेण येथील प्रामुख्याने महिलांसाठी काम करणाऱ्या ‘अहिल्या महिला मंडळ’ या संस्थेच्या संस्थापिका वासंती श्रीकांत देव आणि कळसंबर (ता. बीड) येथे अनाथांसाठी ‘आपला परिवार’ या वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा भाऊराव पवार यांना ‘स्नेहाधार गौरव पुरस्कार’ सन्मापूर्वक प्रदान केला जाणार आहे. निष्णात गिर्यारोहक, गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती स्नेहाधार, पुणेच्या सहसंचालिका गौरी पाळंदे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. माहेर आणि सासरकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा वासंती देव पुढे चालवित आहेत. समाजातील महिलांना आत्मनिर्भर करावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करावा या हेतूने वासंती देव यांनी समविचारी महिलांना एकत्र करून शिक्षण, आरोग्य, समाजस्वास्थ आणि स्त्री सक्षमीकरण या चतु:सुत्रीचा अवलंब करत पेण येथे सुमारे 25 वर्षांपूर्वी अहिल्या महिला मंडळाची स्थापना केली. मनिषा पवार या बीड तालुक्यातील कळसंबर येथे ‘आपला परिवार’ नावाने वृद्धाश्रम चालवत आहेत. ज्यांचे जगाच्या पाठीवर कोणीही नाही अशा अंध, अपंग, बेघर व निराधार आजी-आजोबांचे वृद्धाश्रामत वास्तव्य आहे. पवार यांनी या कार्यासाठी स्वतःचे घर, दोन एकर जमीन संस्थेला दान केली आहे. आजी-आजोबा हिच आपली मुले आहेत या भावनेतून त्यांनी स्वत:ला मूल होऊ दिले नाही आणि आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे.
Read More » -
स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास व जाणीव यशाकडे घेऊन जाते अभिनेत्री अदा शर्मा यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती पुरस्कार’ वितरण
पुणे: “अभिनयातून प्रेरणा देण्याचे काम होते. चित्रपटाची कथा प्रेरणात्मक असेल तरच मी ती स्वीकारते. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी चांगले चित्रपट पाहून प्रेरणा…
Read More » -
महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन
मुंबई, : महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते…
Read More » -
नवकल्पनांना ‘आयपी यात्रे’मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ
अभय दफ्तरदार यांचे प्रतिपादन; ‘एआयसी पिनॅकल’तर्फे दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे उद्घाटन पुणे, : “नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना,…
Read More » -
नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई, : नागपूर शहरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील…
Read More » -
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक २२ मार्च रोजी मध्यरात्री १२.०५…
Read More »