धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

राज्यभरातील प्रत्येक घरा घरात ‘ज्ञानेश्वरी’ ! पारायण सोहळ्यात मोफत ज्ञानेश्वरी वाटप  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटप करणार मंत्री भरत गोगावले

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटन दिनी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील घरा घरात मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथवाटप करणार असल्याची माहिती देत मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “घरात बसणाऱ्यांपेक्षा हिंदुत्वाचा विचार घेऊन जनतेत उतरलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यासोबत जाणे हेच योग्य ठरतं. त्यांचं संतविचारांवर निष्ठा आणि वारकऱ्यांप्रती प्रेम आहे,” असेही ते म्हणाले.

राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आळंदी पारायण सोहळ्यासाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला असून, रायगडसारख्या शिवस्मारकांनाही वारकऱ्यांनी दर्शनासाठी अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन मंत्री गोगावले यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीअक्षय महाराज भोसले पूर्णवेळ समन्व्यक म्हणून आळंदी येथे उपस्थित आहेत.

उद्घाटन सोहळ्यात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, भगवान पोखरकर, राहुल चव्हाण, प्रकाश काळे, रोहिदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी अखंड हरीनाम सप्ताहात बापूसाहेब मोरे यांची सुश्राव्य कीर्तन सेवा रुजू झाली. त्यांनतर आळंदी ग्रामस्थांचे वतीने अन्नदान सेवा महाप्रसाद वाटप झाला. ज्ञानेश्वरी पारायणासह कीर्तनास भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत राज्यभर मोफत ‘ज्ञानेश्वरी’ वाटप करण्यात येणार आहे. आळंदीतील पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी २ कोटींचा निधी जाहीर केला आहे. यामुळे सोहळ्यास भाविकांची प्रशस्त व्यवस्था, नागरी सेवा सुविधा, मंडप व्यवस्था, पर्यायांनी प्रती मोफत भाविकांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button