ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

पुण्यात जैन विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व संस्कारयुक्त हॉस्टेल मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

- राज्यासह देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Spread the love

पुणे, प्रतिनिधी : शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या जैन समाजातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, संस्कारित आणि आधुनिक निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृता सुनील गांधी आणि स्मृती श्रुतेश गांधी यांनी एक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मागील वर्षी कोथरूड येथे सुमारे ७० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले अत्याधुनिक जैन बॉईज हॉस्टेल सुरू करण्यात आले असून त्यास विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आगामी शैक्षणिक वर्षासाठी या हॉस्टेलची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरातसह देशभरातील जैन विद्यार्थ्यांना इथे प्रवेश घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना घरासारखे वातावरण, शिस्तबद्ध जीवनशैली, गुणवत्तापूर्ण भोजन व्यवस्था आणि अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्थापकांनी भर दिला आहे. हॉस्टेलमध्ये एसी रूम्स, वाय-फाय, जिम, इंडोअर गेम्स यांसारख्या सुविधा उपलब्ध असून जैन संस्कारांनी समृद्ध सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून शांत आणि प्रेरणादायी परिसराची उभारणी करण्यात आली आहे.

संस्थापकांनी पुण्यातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इतर निवास सुविधाही विकसित केल्या आहेत. भांडारकर रोड येथे विद्यार्थिनींसाठी जैन गर्ल्स पीजी सुरू करण्यात आले असून सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच नारायण पेठ येथे विद्यार्थ्यांसाठी जैन बॉईज पीजीची व्यवस्था करण्यात आली असून उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती उपयुक्त ठरत आहे.

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुण्यात आणखी एक अल्ट्रा मॉडर्न जैन हॉस्टेल प्रकल्प उभारण्याचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती संस्थापकांनी दिली.

दरम्यान, कोथरूड परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य जैन मंदिराचे उद्घाटन यावर्षी प्रस्तावित आहे. हे मंदिर विद्यार्थ्यांना आध्यात्मिक वातावरण, प्रार्थना, ध्यान आणि जैन संस्कारांशी जोडण्याचे कार्य करणार असून शिक्षणासोबत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासालाही चालना मिळणार आहे.

“आधुनिक सुविधा, जैन संस्कार, सुरक्षित वातावरण आणि उज्ज्वल भविष्य” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थापकांनी सांगितले.

प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थ्यांनी +91 90498 55755 या क्रमनकावर किंवा bookandbunkk@gmail.com या इ मेलवर लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!