धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास बैलजोड निवड समिती बैलजोड सेवा देणार

समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांची घोषणा

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास यावर्षी बैलजोड निवड समिती बैलजोड सेवा देणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा समिती सदस्य नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी दिली. . श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी सेवा देण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ बैलजोडी निवड समितीने या वर्षी जबाबदारी स्वीकारली असून तशी है देखील दिली आहे. सन १९८२ पासून बैल जोड समिती श्रींचे पालखी रथाला बैलजोडी देण्यासाठी ग्रामस्थां मधून नावे मागवून सेवा पुरवली जाते. या वर्षी रानवडे यांचे कडे सेवा देण्याचे रोटेशन होते. मात्र रानवडे कुटुंबात सेवा देण्यावर एकमत न झाल्याने तसेच या सेवेसाठी आपला विचार प्राधान्याने करावा अशी आग्रही मागणी उमेश रानवडे यांनी केल्यामुळे या मागणी साठी त्यांनी लाक्षणिक उपोषण देखील केले. या वेळी सन्माननीय तोडगा काढायची ग्वाही समितीने दिली होती. मात्र उमेश रानवडे यांना तोडगा मान्य न झाल्याने तसेच आपला हट्ट कायम ठेवून न्यायालयात जाणार असल्याचे सांगत तोडगा मान्य नसल्याचे सांगितले. यावर समितीने या वर्षी सर्वमान्य निर्णय रानवडे परिवारात झाला नाही. अखेर समितीने या प्रकरणी आळंदी पोलिसांत तक्रार देत समितिने स्वता बैलजोडी देण्याचा निर्णय घेऊन देवस्थान ला पत्र देऊन कळविले असल्याचे कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. या वर्षी समितीकडे आलेल्या अर्जातून हर्षवर्धन रानवडे, तुळशीराम रानवडे यांच्या नावाची घोषणा बैलजोड सेवा देण्यासाठी समितीने केली होती. यावर उमेश रानवडे यांनी हरकत घेत आपली बैलजोडी लावण्याचा हट्ट धरला. तत्पूर्वी तोडगा मान्य करून नंतर न्यायालयात जाणार असल्याची त्यांनी भूमिका घेतली. मात्र समिती ने अर्जदार यांचे अर्जा प्रमाणे स्थळ पाहणी केली असता बैल जोडीचा गोठा व बैलजोड उमेश रानवडे यांचे कडे नसल्याचे तीन सदस्य समिती चे स्थळ पाहणी उघड झाले.
या मुळे समितीने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे तक्रार देत केली आहे. रानवडे परिवारात अंतर्गत वाद असल्याने निर्णय समितीने जाहीर केला. या वर्षी नाहक वाद निर्माण करून समितीचे कामकाजात हस्तक्षेप करण्यात आला. मात्र समिती चे वेगळे अस्तित्व आहे. या वर्षी तीन सदस्य समिती उपोषणा वेळी जाहीर केली. त्या ही समितीने अहवाल देत कामकाज केले. मात्र पूर्ण सहमती न मिळाल्याने अखेर स्वतः बैलजोड निवड समिती या वर्षी बैलजोड सेवा देणार असल्याचे समितीने जाहीर करीत निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिस प्रशासनावर देखील ताण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समितीने केला. स्थानिक राजकीय हेतूने प्रेरित व्यक्ती, संस्था, पदाधिकारी यांनी वाद निर्माण केला असल्याचे आरोप ही समितीने केले आहे. ते उघड झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे. आळंदीकर ग्रामस्थ बैलजोड निवड समितीने आपला निर्णय आळंदी देवस्थान ला पत्र देऊन कळविल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!