ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१००० सूर्यनमस्कारचे उदिष्ट पूर्ण – धीरज घाटे

Spread the love

पुणे :- प्रतिनिधी :- अंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने 21000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम पूर्ण केला. या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने करण्यात आलेले होते
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून पाठिंबा मिळाला योगामुळे केवळ शरीरच तंदुरुस्त राहत नाही तर मन देखील शुद्ध व तंदुरुस्त राहते या उपक्रमासाठी पुण्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरांमध्ये दिनांक 21 जून रोजी अनेक ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याची सुरुवात आज झाली.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे,क्रीडा भारतीचे प्रदेश अध्यक्ष विजय पुरंदरे, नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेविका प्रियांका शेंडगे, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस दीपक पोटे सुशील मेंगडे नामदेव माळवदे, लक्ष्मण आरडे,प्रचार प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष आनंद पाटील श्रीमती अनुराधा एडके यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!