ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्रशहर

मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटेतर्फे ‘एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ कोर्सचा शुभारंभ

Spread the love

पुणे, ३ ऑगस्ट ः भारतातील आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. ज्यामुळे लाखो नोकर्‍या निर्माण होत आहेत. २०३० पर्यंत याची मागणी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. हाच धागा पकडून मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ पाठ्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे. या पाठ्यक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र-शिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. अशी माहिती संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. सरोजा अस्थाना पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी, एमआयआरएमचे कार्यकारी संचालक डॉ. विलास फरांदे व प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते.

डॉ. सरोजा अस्थाना यांनी सांगितले की, “वैद्यकीय क्षेत्रात या कोर्स नंतर मोठी संधी उपलब्ध आहेत. हा पाठ्यक्रम रुग्णालय आणि फार्मा ऑपरेशन्स, मेड टेक इनोव्हेशन, हेल्थकेअर अ‍ॅनालिटिक्स आणि धोरण या क्षेत्रांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि सखोल ज्ञान विकसित करतो. ज्या मध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, इंडस्ट्रीज , एनजीओ तसेच हेल्थ केअर क्षेत्रात सेवा देणार्‍या नामांकिमध्ये इंटर्नशीपसाठी संस्था दरवाजे उघडे करुन दिल्या जातील. तसेच नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

डॉ. विलास फरांदे यांनी सांगितले की, “या पाठ्यक्रमाला महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाची मान्यता असून मेडिकल क्षेत्रातील विविध पदवीधर यासाठी प्रवेश घेऊ शकतात. दोन वर्षाचा कालावधी असून माफत फी मध्ये उपलब्ध आहे. तसेच शासनाच्या विविध सवलती व शिष्यवृत्ती आहे. यासाठी ३१ ऑगस्ट ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे.

“संस्थेची १०० टक्के नोकरी देण्याची यशस्वी परंपरा असून पुढे ही सुरू राहिल. अद्ययावत अभ्यासक्रम, तज्ञ प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातीली तज्ञांमार्फत मार्गदर्शन, इंटर्नशीप, नोकरीसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य दिल्या जाते. सध्या हेल्थ केअर क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून या क्षेत्रात कुशल व्यवस्थापन तज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या मुळे विविध संधी उपलब्ध आहेत.”

प्रा. सुनील चव्हाण यांनी सांगितले की,“मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट गेल्या  १६ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सरोजा अस्थाना या नोबेल पारितोषिक सहभाग विजेत्या असुन त्या उच्च शिक्षित अभियंता आहे. त्यांनी आयआयटी खडगपूर येथून पीएचडी मिळवली आहे. त्यांनी एनसीएल मध्ये संशोधक म्हणून ही कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात ही संस्था व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहे.”

या संस्थेचे कॅम्पसमध्ये १०० बेड आयवी लीफ आयुर्वेदिक रुग्णालय आहे. येथे गरजू व गरीब रुग्णांना माफक दरात रुग्णसेवा दिली जाते. येथील मालेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत संयुक्तपणे कार्य केले जाते.

‘एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ चा उद्देश्यः

विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा क्षेत्रातील नेतृत्व आणि प्रशासकीय भूमिकांसाठी तयार करणे, आरोग्य सेवा व्यवस्थापन तत्वे आणि व्यवसाय धोरणाचे सखोल ज्ञान देणे, आरोग्य सेवा संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे. आरोग्य सेवा क्षेत्रातील मानव संसाधन, विपणन, कार्यसंचालन, वित्त, तंत्रज्ञान आणि नवीनतम प्रवाहांची सखोल माहिती देणे, रुग्णालय आणि आरोग्यसेवा धोरणे, नियम, विनियसम प्रमाणित कार्य पद्धती आणि नीतिमत्ता समजून घेण्याची क्षमता विकसित करणे, आणि व्यावहारिक शिक्षणसंस्था उद्योग यांच्यातील समन्वयातून आजीवन शिक्षण आणि विकासासाठी आवश्यक असलेले अनुभवात्मक शिक्षण, चिकित्सक विचार आणि सरावात्मक स्वयं अध्ययन कौशल्ये विकसित करणे आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी मो.नं. ९९२३८१०४३७ /९२०९०६१८०८ वर किंवा www.mirm.mgi.ac.in या संकेतस्थावर भेट देऊ शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!