ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

अदिरा डेव्हलपर्सच्या वतीने स्वस्तात फ्लॅट उपलब्ध

बँक लोन न करताही मिळणार घरे

Spread the love

पुणे : महानगरातील आवाढव्य घराच्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर फ्लॅट आणि प्लॉट्स झाले आहेत. सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अदिरा डेव्हलपरच्या वतीने स्वस्तामध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोरगरीब आणि तळागाळातील नागरिकांना ही घरे परवडणारी आहेत.
अदिरा डेव्हलपर्सचे उद्घाटन सहा महिन्याच्या चिमुकली अदिरा सहारे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ॲड. पुजा सहारे, अजय परदेशी, श्रीपाद कदम, अविनाश महामुनी, हेमंत लडकत, देवेंद्र सहारे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक महानगरामध्ये आज फ्लॅटच्या किमती आकाशाला भिडले आहेत. अनेक नागरिकांना होम लोन घेताना देखील प्रचंड अडचणी येत आहेत. सिव्हिल खराब, चेक बाउन्स, पेमेंट स्लिपचा अभाव आदी कारणामुळे होम लोन होत नसल्याने बँका नागरिकांना उभे करीत नाहीत. परिणामी अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहतात, हीच गरज ओळखून अदिरा डेव्हलपर्सच्या वतीने स्वस्तामध्ये घर देण्याचा मानस असल्याचे ॲड. पुजा सहारे यांनी सांगितले. रेरा रजिस्टर असलेले काही बिल्डर्सचे फ्लॅट नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कमी डाऊन पेमेंटमध्ये हे फ्लॅट नागरिकांना देण्यात येणार असून कुठल्याही प्रकारची लोन अथवा बँकिंग न करता देखील हप्ते अदिरा डेव्हलपर्स कडे जमा केल्यास फ्लॅट तसेच प्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पुजा सहारे यांनी सांगितले.दरम्यान या योजनेमुळे अनेकांना घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!