आळंदीतून आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्यास पाहुणचारासह निरोप
गांधीवाड्यात पालखी सोहळ्यात हरिजागर ; भाविकांची दर्शनास गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : लाखो वैष्णव भक्तांचे मांदियाळीने भगव्या पताका उंचावत आळंदीहून उद्योगनगरी मार्गे पुण्यनगरीकडे माऊलींचा पालखी सोहळा भल्या पहाटे हरिनाम गजरात मार्गस्थ झाला. अलंकापुरीतील जुना श्रीपादबुवा गांधी वाडा आणि राम वाड्याचे जागेत नव्याने विकसित दर्शनबारी मंडप आजोळघरी ( गांधीवाडा ) माऊलींचे पालखी सोहळ्याने पहिल्या मुक्कामात श्रीक्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी परिवारासह आळंदीकरांचा पाहुणचार घेतला. श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याने गुरुवारी ( दि.९ ) दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्यनगरीकडे प्रवासास सुरुवात केली. पंढरी जाण्यास आळंदीकरांचा हृदयस्पर्शी निरोप गांधीवाड्यातून तसेच नगरपरिषद चौकातून निरोप दिला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस विसावणार असून शनिवारी ( दि. ११ ) दिवेघाट मार्गे सासवड ला निघेल.
आळंदीतील एक दिवसाचे मुक्कामा नंतर श्रीचे सोहळ्यास निरोप देण्यासाठी आळंदीकर धाकट्या पादुका, थोरल्या पादुका मंदिरा पर्यंत लहानग्यासह आले होते. सोहळ्यात सुमारे बत्तीस दिवसांचा विरह आळंदीकरांना सहन करावा लागणार असल्याने माऊलींना निरोप देताना अनेकांचे नेत्रांच्या कडा पान्हावल्या. तर अनेकांचे हृदय भरून आले होते. माऊली मंदिरात तसेच पहिल्या एक दिवसाचे मुक्कामासाठीचे नियोजन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, निलेश महाराज लोंढे, रोहिणी पवार, योगी निरंजननाथ, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक यांचेसह सेवक कर्मचारी यांनी केले. पोलीस, महसूल प्रशासन, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केलेल्या सूचना प्रमाणे कामकाज करीत नियोजन केले.

गेल्या चार दिवसांपासून आळंदीत वैष्णवांचा हरिनामाचा गजर चालू होता. गुरुवारी पहाटे भाविकांना आजोळघरातील माऊलींच्या पादुकांचे दर्शन पालखीसह रथातून झाले. आजोळघरी गांधी कुटुंबीयांच्या वतीने रुद्राभिषेक आणि पादुका पूजन करण्यात आले. त्यांच्या वतीने नैवेद्य दाखविण्यात आला. देवस्थानच्या वतीने पहाट पूजा आणि आरती झाली. यानंतर उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माऊलींना प्रथा परंपरेने नैवेद्य वाढविण्यात आला. दरम्यान आळंदीकर ग्रामस्थ माऊलींची पालखी खांद्यावर उचलण्यासाठी पहाटे पासून सज्ज झाले होते. श्रीची पालखी आजोळघरातून आळंदीकर ग्रामस्थ, खांदेकरी यांनी खांद्यावर घेत श्रींचे रथात ठेवली. माऊली – माऊली नामाच्या गजरात व “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या नामजयघोषात पालखी नगरपालिका चौकातून नवीन पुलावरून पुढे पुण्याकडे हरिनाम गजरात मार्गस्थ झाली. तत्पूर्वी स्व. माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांचे वतीने सुदीप गरुड आणि गरुड परिवाराने लक्षवेधी पुष्प सजावटीने सजलेल्या वैभवी चांदीचे रथात पालखी ठेवली. आळंदी पालिकेच्या वतीने देवस्थान समिती, मालक, चोपदार, दिंडीकरी या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आळंदी नरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे सह नगरपरिषद, महसूल अधिकारी, आरोग्य अधिकारी, आळंदी नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आयुक्त विनयकुमार चौबे यांचे नियंत्रणात आळंदीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींचे माध्यमातून बंदोबस्त लावण्यात आला होता.
दरम्यान, आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग, पालिका चौक, देहू फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी माउलींच्या पालखी रथाचे तसेच पालखीतील पादुकांचे दर्शनासाठी तसेच सोहळ्यास निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील महिला, पुरुष, लहान मुले माउलींच्या रथासोबत चालत होते. दरम्यान, विविध मंडळे, संघटनांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा, पोहे, गुडदाणी, पाणी वाटप उत्साहात करण्यात आले. या वर्षी पुलाचे कठडे महापुराने तुटल्याने देखभाल दुरुस्ती सुरु असल्याने पुलाचे दुतर्फ़ा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आळंदीत भाविकांना बुंदी प्रसाद वाटप ; आरोग्य सेवा माउलीचे वैभवी पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देत आळंदीत येथील समाजरत्न नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, जय भगवान प्रतिष्ठानचे वतीने बिस्कीट



