धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवातील सजावटीचे वासापूजन उत्साहात

वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमान ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ 

Spread the love

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्या सजावटीचा श्रीगणेशा वासापूजनाने झाला.

पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे आयोजित कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, यंदाचे कलादिग्दर्शक नितेश कुमार, काळे मांडववाले यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल. जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते या संकल्पनेवर आधारित ही भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्ती देखील असणार आहेत. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!