ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

बार्टी अधिछात्रवृत्ती प्रश्न: ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ची समाजकल्याण आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा; मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन*

Spread the love

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नव्याने स्थापन झालेल्या ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाने आज समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत शिष्टमंडळाने बार्टी अधिछात्रवृत्तीच्या (BANRF) जागांची संख्या केवळ १०० न ठेवता ती किमान ६०० करावी आणि ३५ वर्षांची जाचक वयोमर्यादेची अट पूर्णपणे रद्द करावी, या प्रमुख मागण्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्यांची गांभीर्यपूर्वक दखल घेत आयुक्त दीपा मुधोळ मॅडम यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी निबंधक (बार्टी) यांच्या समवेत एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

शिष्टमंडळात प्रमुख नेत्यांचा समावेश

समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मॅडम यांच्यासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण चर्चेत ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या विद्यार्थी शिष्टमंडळाचे नेतृत्व आणि सहभाग राहुल डंबाळे, राहुल ससाने, अक्षय कांबळे, सिद्धार्थ ओव्हाळ, सुरेखा मेश्राम, प्रथमेश सूर्यवंशी आणि नितीन आंधळे यांनी केला. त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू अत्यंत प्रखरपणे प्रशासनासमोर मांडली.

 

१९ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

१२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बार्टी निबंधकांसोबतच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास, सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्र येत १९ ऑगस्ट २०२६ पासून पुणे येथील समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर ‘बेमुदत धरणे आंदोलन’ करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संधींमधील भेदभाव आणि जाचक अटींविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने उतरणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!