देहूच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध कार्यकर्ता – नगरसेवक योगेश काळोखे
योगेश काळोखे यांच्या दहीहंडीला रेकॉर्डब्रेक गर्दी

पिंपरी चिंचवड (बद्रीनारायण घुगे ):देहूगाव नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करणारा कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक योगेश काळोखे असल्याचे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. देहूगाव येथे नगरसेवक योगेश काळोखे युवा मंच यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाच्या वेळी आमदार शेळके बोलत होते.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने देहूगावमध्ये प्रथमच भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी वैकुंठस्थान मंदिराजवळ, नगरपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या उत्सवाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विविध गोविंदा पथकांनी थर लावून दहीहंडी फोडण्याचा रोमांचक अनुभव देहूवासीयांना दिला.
*चाकणच्या झित्राई देव गोविंदा पथकाची बाजी*
उत्सवाची सुरुवात कुसगावच्या गोविंदा पथकाच्या सादरीकरणाने झाली, तर चाकण येथील झित्राई देव गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे दहीहंडी फोडली. या विजेत्या पथकाला ₹१,५१,१११ चे रोख बक्षीस देण्यात आले.
मनोरंजनाचा समारंभ रंगतदार
उत्सवात लावण्यवती मानसी पुणेकर आणि अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या सादरीकरणांनी रंगत आणली. “गोविंदा आला रे”, “जरा मटकी संभाल” यांसारख्या गाण्यांवर उपस्थित तरुणाई थिरकत होती.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या प्रसंगी आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक पंकज भालेकर, देहू नगरपंचायतीच्या अध्यक्षा पूजा दिवटे, उपाध्यक्षा प्रियंका मोरे, नगरसेवक योगेश परंडवाल, अमोल शिवशरण, नगरसेविका पूजा काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
योगेश काळोखे यांच्या पुढाकाराने देहूगावात अशा भव्य प्रमाणात दहीहंडी उत्सव प्रथमच साजरा करण्यात आला. या उपक्रमातून ते फक्त सामाजिक नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.