आळंदीत अजा एकादशी हरिनाम गजरात साजरी ; इंद्रायणीची आरती ; नदी घाटाची स्वच्छता

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीत अजा एकादशी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत साजरी करण्यात आली. श्रींचे गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. पावसाची दिवसभर संततधार सुरु होत. इंद्रायणी नदी ने महापुराची पाण्याने काठ सोडला असून नदीचे दुतर्फ़ा पाणी पसरले आहे. इंद्रायणीत भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून नदीवरील दोन बंधारे पाण्या खाली गेले आहेत.
भाविकांनी इंद्रायणी नदीचे पाणी पाहत सेल्फीचा आनंद घेत इंद्रायणी नदीवर इंद्रायणी चे आरतीसाठी हजेरी लावली. इंद्रायणी आरती सेवा समिती, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांनी घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात केली. यावेळी पसायदान आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अजा एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी महिलांनी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराची पाण्याचे पूजन केले.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजिका अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, बाबासाहेब भंडारे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, सरस्वती भागवत, शोभा कुलकर्णी, अनिता शिंदे, कौसल्या देवरे, विमल मुसळे, पुष्पा लेंडकर, सखुबाई मुंडे, शीला कुलकर्णी, शैला कुलकर्णी आदी मान्यवर महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी कायम सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शासनाने तात्काळ प्रदूषण मुक्त इंद्रायणी साठी उपाय योजना कराव्यात असे आवाहन संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती सेवा समिती संयोजक अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी नियोजन केले.