खेलब्रेकिंग न्यूज़मराठी

‘सीएसके करंडक’ खुल्या गटाची टी-२० क्रिकेट स्पर्धा

मॅव्हरीक्स् बॉईज संघाला विजेतेपद !!

Spread the love

पुणे, लिजंड्स स्पोटर्स क्लब यांच्यावतीने आयोजित ‘सीएसके करंडक’ खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत सागर होगाडे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या मदतीने मॅव्हरीक्स् बॉईज संघाने सालुदर हेल्थकेअरचा ३० धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

मुंढवा येथील चंचलाताई कोद्रे स्पोटर्स कॉम्प्लेक्स्च्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना मॅव्हरीक्स् बॉईजने २० षटकामध्ये १८८ धावा धावफलकावर लावल्या. अभिनव तिवारी आणि  आदित्य लोंढे या दोघांनीही ४१ धावांची खेळी केली. याशिवाय रिषी नाळे (३० धावा), यश क्षीरसागर (२२ धावा) आणि सिद्धेश वीर (१८ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा डाव उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना सालुदर हेल्थकेअर संघाचा डाव १५८ धावांवर आटोपला. रविंद्र जाधव याने ३२ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ७० धावांची खेळी केली. पण दुसर्‍या बाजुने कोणताही फलंदाज उभा राहू शकला नाही. जलतदगती गोलंदाज सागर होगाडे याने २२ धावांमध्ये ४ गडी टिपले. यासोबतच अक्षय वाईकर यानेसुद्धा ३६ धावांमध्ये ४ गडी बाद करून मॅव्हरीक्स् बॉईज संघाचे विजेतेपद निश्चित केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण चंचलाताई कोद्रे स्पोटर्स कॉम्प्लेक्स्चे संचालक संदीपदादा कोद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या मॅव्हरीक्स् बॉईज संघ आणि उपविजेत्या सालुदर हेल्थकेअर संघाला करंडक, मेडल्स् आणि रोख पारितोषिके देण्यात आली.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
मॅव्हरीक्स् बॉईजः २० षटकात ७ गडी बाद १८८ धावा (अभिनव तिवारी ४१, आदित्य लोंढे ४१, रिषी नाळे ३०, यश क्षीरसागर २२, सिद्धेश वीर १८, नीरज जोशी २-३८) वि.वि. सालुदर हेल्थकेअरः १९ षटकात १० गडी बाद १५८ धावा (रविंद्र जाधव नाबाद ७० (३२, २ चौकार, ८ षटकार), कुलदीप गेही १५, आशिष सिंग १४, सागर होगाडे ४-२२, अक्षय वाईकर ४-३६); सामनावीरः सागर होगाडे;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि गोलंदाजः मेहूल पटेल (स्केलअप अ‍ॅकॅडमी);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः पवन शहा (२५२ धावा, अ‍ॅथएलिट क्लब);

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!