मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी वचनबद्ध डॉ.संजय मालपाणी यांचे विचार
उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचे लोकार्पण

पुणे, २३ ऑगस्टः ‘समत्वम योग उच्चते’ हे तत्व आणि भारतीय संस्कृती व योगिक मूल्यांवर आधारित ध्रुव ग्लोबल स्कूल मुलांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देते. अमेरिकन शास्त्रज्ञ हॉबर्ड गार्डनर यांनी १९८२ मध्ये मांडलेल्या मल्टीपल इंटेलिजेन्ट थेअरीचा वापर येथे केला जातो. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये केला जातो.” असे विचार मालपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.
मालपाणी फाउंडेशनच्या उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सीबीएसई आणि आईसीएससीईच्या शाळेच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी, समन्वयक अनुष्का यशवर्धन मालपाणी, ध्रुव ग्लोबल स्कूल उंड्रीच्या प्राचार्या श्रद्धा राव,
प्राचार्य संगीता राऊतजी, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. संजय मालपाणी म्हणाले,” विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळाबरोबरच सर्वच गोष्टीत संतूलन ठेवावे. मुलांनी कोणत्या आहाराचे सेवन करावे, निद्रा किती घ्यावी याची हे समत्व असते. अशा समत्वाची मुले घडावीत या दृष्टीकोनातून शाळेची स्थापना करण्यात आली आहे. मुले हे वेगवेगळ्या बुद्धीमत्तेचे असतात. पहिली ते चौथी पर्यंतचा काळ त्यांची बुद्धिमत्ता शोधून काढण्याचा काळ असतो. ही बुद्धिमत्ता कळली तर पुढे त्यांचा परिपूर्ण विकास करता येतो. मुलांच्या इच्छे विरुद्ध शिक्षण दिले तर त्यांचे वाटोळे होते आणि हे टाळण्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूल एक माध्यम आहे. उंड्री येथील स्कूलमध्ये १ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यांच्यासाठी स्विमिंग पूल, बॉस्केटबॉल कोर्ट, मैदान, ८ बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, योगा आणि रायफल रेंज आहे.”
” संगमनेर येथील स्कूल ने गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये ६०० मुलांनी एकूण ११५९ पदके प्राप्त केली आहेत. त्यातील १४ पदके खेलो इंडिय व १० एशियन पदकांचा समावेश आहे.”
यशवर्धन मालपाणी म्हणाले,” आधुनिक काळात शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मिक्स एज क्लासरुम शाळेची गरज आहे. ज्यामध्ये १ ते ३ चे विद्यार्थी, ४ थी ते ६ वीं पर्यंतचे विद्यार्थी एक सोबत असणे हा प्रयोग आहे. यामध्ये मुले खूप गतीने शिक्षण घेतात. ६वीं पर्यंत मुलांना कोणताही ताण न देता शिकविले जाऊ शकते. शिक्षणामध्ये परिवर्तन आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तसेच शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.”