शरद पाटणकर यांची दीपस्तंभ फौंडेशनला देणगी

समाजाच्या विविध क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल जनसेवा फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त व लायन्स क्लब इंटरनशनलचे लाईफ मेंबर व माजी प्रांतपाल लायन शरदचंद्र पाटणकर यांनी लायन्स सहयोगी क्लब्ज आयोजित शिक्षक दिनौरव सोहळ्याच्या वेळी दीपस्तंभ फौंडेशनचा मनोबल या सामाजिक संस्थेला एक लाख रुपयांची देणगी दिली.
या प्रसंगी शुभांगी पाटणकर ,लायन्स संघटनेचे माजी प्रांतपाल ला . डॉ. दीपक शहा,सी.डी शेठ ,शेखर गायकवाड .श्री सुनील रेडेक संचालक पुणे विध्यार्थी गृह संस्था, आपले घर चे संस्थापक श्री .विजय फळणीकर दीपस्तंभ फौंडेशनचे यजुर्वेंद्र अनिल महाजन व मान्यवर उपस्थित होते.
शरदचंद्र पाटणकर यांनी आत्तापर्यत वृध्दाश्रम,गोशाळा,गरिबांसाठी वैद्यकीय,शैक्षणिक मदत,भिकार्यांसाठी वसतीगृहे,नर्सिंग स्कूल,बाबा आमटे यांच्या आनंदवन शिक्षण अशासारख्या १०० हून आधिक संस्थांना एक कोटी रुपयांहून आधिक आर्थिक मदत केलेली आहे अशी माहिती शुभांगी पाटणकर यांनी दिली .
शरदचंद्र पाटणकर म्हणाले “प्रतिकूल परिस्थितीने आजचा पाटणकर घडविला आहे. आजच्या यशामध्ये माझी पत्नी शुभांगी हिचा फार मोठा सहभाग आहे.गरजूंना मदत करण्यात एक प्रकरचे मानसिक समाधान लाभतेचा त्याचा आनंद आम्ही सामाजिक जीवनात घेत आहोत”.
“यजुवेन्द्र महाजन म्हणाले “शरदचंद्र पाटणकर व शुभांगी पाटणकर दोघ अनेक वर्षांपासून नियमित पणे या प्रकल्पासाठी दरवर्षी विद्यार्थ्याचे दत्तक पालकत्व स्विकारत आहेत. यांच्या सारख्या सर्हुद्यी ,संवेदनशील व्यक्तींमुळेच अशा प्रकारचा प्रकल्प लोक सह्भागातून देशभरात चालतो. समाजामध्ये असे दीपस्तंभ आहेत म्हणूनच समाजात या चांगल्या गोष्टी सुरु होतात आणि त्या विस्तारत जातात. त्या मुळे अशा व्यक्ती या समाजाच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आणि पालक असतात.देशातल्या सर्व प्रकरच्या दिव्यांग ,अनाथ, आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणार्या युवकांना निवासी व अनिवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी मदत करणारी, दीपस्तंभ फौंडेशन हि देशातील एकमेव आणि पहिली संस्था जळगाव पुणे आणि दिल्ली येथे काम करत आहे. राज्यातील ६०० विद्यार्थी निवासी तर हजारो विद्यार्थी अनिवासी शिक्षण घेतात.”



