मराठी

राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस्‌‍ आणि स्नुकर अकादमी‌’व्दारे पुण्यात नव्या युगाचा प्रारंभ !!

पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त गीत सेठी यांच्या हस्ते या राष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन संपन्न !!

Spread the love

पुणे, ३० सप्टेंबरः पुणे शहरातील क्यु क्रीडाप्रकारामध्ये ‌‘राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस्‌‍ आणि स्नुकर अकादमी‌’च्या स्वरूपातून एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. ‌‘पॅशन मीट्स परफेक्शन‌’ म्हणजेच क्यु स्पोर्ट्‌‍सची आवड आणि ध्यास असलेल्या खेळाडूंना परिपूर्णतेकडे नेण्याचे कार्य होणाऱ्या या राष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्‌‍स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे (सोमवार, २९ सप्टेंबर) करण्यात आले.

बिलीयर्डस्‌‍ अँड स्नुकर फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीएसएफआय) माजी अध्यक्ष आणि मनीषा ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष मा.श्री. राजन खिंवसरा आणि पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त आणि नऊ वेळा क्यु क्रीडा स्पर्धेत जागतिक विजेते ठरलेले मा.श्री. गीत सेठी यांच्या हस्ते या राष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी श्री पुना गुजराथी बंधु समाजाचे आणि जयराज स्पोर्ट्‌‍स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे अध्यक्ष मा.श्री. नितीनभाई देसाई, श्री पुना गुजराथी बंधु समाजाचे कार्यकारी ट्रस्टी आणि जयराज स्पोर्ट्‌‍स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे कार्यकारी संचालक मा. डॉ. राजेश शहा, श्री पुना गुजराथी बंधु समाजाचे सह-कार्यकारी ट्रस्टी आणि जयराज स्पोर्ट्‌‍स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे सह-कार्यकारी संचालक मा.श्री. नैनेश नंदु आणि बिलीयर्डस्‌‍ अँड स्नुकर फेडरेशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल मा.श्री. सुनिल बजाज उपस्थित होते. तसेच श्री पुना गुजराथी बंधु समाजाचे ट्रस्टी आणि सेंटरचे समिती सदस्य उपस्थित होते.

मा.श्री. राजन खिंवसरा म्हणाले की, जागतिक दर्जाच्या मानांकनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळणाच्या सर्व परिमाणे पूर्ण करणारी ही अकादमी क्यु स्पोर्ट्‌‍सचे सर्वोत्तम ‌‘डेस्टिनेशन‌’ ठरणार आहे. प्रमाणित प्रशिक्षक, संरचित प्रशिक्षण कार्यक्रम, अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध असलेल्या या अकादमीमध्ये भविष्यातील चॅम्पियन खेळाडू निर्माण करण्याचे आणि सभासदांना प्रीमियम स्तरावर खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शर्मा (एस-१) प्रीमियम व्यावसायिक ४ टेबल, चॅम्पियनशिप ‌‘लक्स‌’ पातळीशी जुळव्यासाठी विशिष्ठ पद्धतीने रचना केलेली अचूक प्रकाश योजना आणि आलिशान लाऊंज शैलीचे वातावरण असलेली ही अकादमी भारतातील खेळासाठी एक नवा अध्याय स्थापित करेल, असा विश्वास आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करताना गीत सेठी म्हणाले की, पुण्यामध्ये या राष्ट्रीय अकादमीची वास्तु आणि संपूर्ण सोयी-सुविधा बघुन मी थक्क झाले आहे. मी जेव्हा खेळत असे त्यावेळी अशा सोयी-सुविधांची कमतरता होती. एक जागतिक विजेता खेळाडूच्या जडणगडणासाठी सर्वोत्तम प्रशिक्षक, सर्वोत्तम मार्गदर्शन यांच्यासोबत जागतिक दर्जाच्या क्यु क्रीडा प्रकाराच्या सुविधा आवश्यक असतात आणि या अकादमीमध्ये या सोयी-सुविधा उपलब्ध असून यातून एक चांगला खेळाडू निर्माण झाला तर आश्चर्य वाटायला नको !

२००६ मध्ये पीसीएफ-मनीषा ओपन स्नुकर चॅम्पियनशिपपासून ते आत्तापर्यंत १४ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असण्यापर्यंत, आशियाई आणि भारतीय खुल्या, जागतिक मानांकन स्पर्धा तसेच क्यु स्पोर्ट्‌‍सच्या खेळामध्ये अविश्वनीय योगदान देण्याऱ्या अकादमीमध्ये असणाऱ्या सोयी आणि सुविधांबद्दल बोलताना राजन खिंवसरा म्हणाले की, चार व्यावसायिक टेबल शर्मा एस-१ प्रीमियम कंपनीचे असून १२ बाय ६ फुट टुर्नामेंट ग्रेड टेबल्स्‌‍, अूचकस्तरीय इटालियन स्लेट आणि स्ट्रॅचन चॅम्पियनशीप कापड या टेबलांवर वापरण्यात आले आहे. अकादमीच्या संपूर्ण सभागृहात अत्याधुनिक अँटी-ग्लेअर एलईडी पॅनेल जे एकसामन ८५०-१००० लक्स आणि सावलीमुक्त तसेच डब्ल्युएसएफ मानांकानुसार प्रमाणित आहेत. सेंट्रल कुलिंग सिस्टीमसह संपर्णू वातानुकूलित तसेच शांतता सुनिश्चित करण्यासाठी ध्वनिक इंटीरियर आणि प्रीमियम डिझायनर फ्लोरिंगसह यांसह परिपूर्ण असलेल्या या हॉलमध्ये एकाग्रता आणि लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी उपयुक्त ठरणारे वातावरण तयार करण्यात आले आहे. खेळाडू आणि तसेच पालक, पाहुणे या सर्वांच्या बैठकीसाठी लक्झरी लाउंज, खेळाडूंसाठी खाजगी लॉकर्स आणि सभासदांसाठी कपडे बदलण्याची सुविधा, अल्पोपहाराची सोय अशा आरामदायी आणि महत्वपूर्ण सुविधा या अकादमीमध्ये समाविष्ठ करण्यात आल्या आहेत.

नवीन, हौशी आणि युवा खेळाडूंपासून व्यावसायिक खेळाडू या सर्वांसाठी बीएसएफआय प्रमाणित प्रशिक्षकांव्दारे तयार केलेले प्रशिक्षण कार्यक्रम अकादमीमध्ये राबविण्यात येणार आहेत. प्रमाणित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुकांसाठी वैयक्तिक प्रशिक्षणाची सोयही उपलब्ध असणार आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी आणि प्रतिभा तयार करण्यासाठी आंतर-लीग आणि मानांकन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय राज्य संघटना आणि राष्ट्रीय फेडरेशन यांच्या सल्ग्नतेनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धाही आयोजित करण्याचा आमचा हेतू आणि उद्दीष्ट्य आहे. या सर्व प्रयत्नांमुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर युवा प्रतिभेला संधी मिळवून देण्याचे मुख्य काम अकादमीच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे क्यु स्पोर्ट्‌‍सच्या वाटचालीमध्ये पुण्यातील ही अकादमी उत्कृष्टतेचा एक नवा ‌‘बेंचमार्क‌’ ठरणार आहे.

मा.श्री. राजन खिंवसरा यांच्याबद्दल महत्वाची घोषणा करताना बिलीयर्डस्‌‍ अँड स्नुकर फेडरेशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल मा.श्री. सुनिल बजाज म्हणाले की, पीसीएल-मनीषा खुल्या स्नुकर स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धेचे प्रायोजकत्व असण्यापर्यंत, आशियाई आणि भारतीय खुल्या, जागतिक मानांकन स्पर्धा अशा क्यु स्पोर्ट्‌‍सच्या खेळात आयोजनामध्ये राजन खिंवसरा यांचे निस्वार्थ योगदान अविश्वनीय आहे. क्यु क्रीडाप्रकाराला योग्य प्रसिद्धी आणि अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी खिंवसरा अवितर काम करत आहेत. या खेळाचा शालेय अभ्यासक्रमात आणि ऑलिंपिकमध्ये समावेश व्हावा, त्यांचा मानस आहे. खिंवसरा यांचे समाजासाठी योगदान सामाजिक-आर्थिक विकास आणि शांततेसाठी वचनबद्ध असून वेगवेगळ्या मार्गाने आणि पद्धतीने दिसुन येत आहे. यामुळेच बिलियर्ड्‌‍स आणि स्नुकर फेडरेशन ऑफ इंडियाने (बीएसएफआय) पद्मश्री पुरस्कारासाठीचे नामांकन दिले आहे.

श्री पुना गुजराथी बंधु समाज आणि जयराज स्पोर्ट्‌‍स अँड कन्व्हेन्शन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिले पंचतरांकित क्रीडा आणि कन्व्हेन्शन सुविधा सेंटर अभिमानाने सादर करत आहे. या सेंटरमध्ये ३१ हून अधिक क्रीडा प्रकारांच्या सुविधा, सहा रेस्टॉरंट्स आणि सहा कन्व्हेन्शन हॉल यांचा समावेश आहे. पुणे शहरातील गुजराती बंधु समाजाने सुमारे १५० कोटी रूपये खर्चून तयार केलेल्या या सेंटरमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच प्रीमियम हॉस्पिटॅलिटी याचा एकत्रित दुहेरी संगम साधत आहे. ज्यामध्ये क्रीडा उत्कृष्टता आणि लक्झरीची नवीन आयाम आणि मानके स्थापित करण्याचे काम केले गेले आहे. श्री पुना गुजराथी बंधु समाज आणि जयराज स्पोर्ट्‌‍स अँड कन्व्हेन्शन सेंटर या दोन्हीव्दारे भारताच्या क्रीडा नकाशावर पुण्याचे स्थान मजबुत अधिक दृढ करण्याचे काम करणार असून यामुळे क्रीडा क्षेत्रातही पुण्याचा वारसा एक नव्या युगामध्ये प्रवेश करेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!