ब्रेकिंग न्यूज़मराठी
रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे झेनिथच्या अध्यक्षपदी समृद्धी खाडे.

पुणे (दि.१०) रोटरॅक्ट क्लब पुणे झेनिथच्या अध्यक्षपदी समृद्धी खाडे यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी अथर्व खटखटे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष अभिषेक वटणी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सीएमए भवन कर्वेनगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी IPDRR अक्षय मोरे, रोटरी क्लब सिंहगडचे अध्यक्ष अमेय पासलकर, सचिव प्रियंका लागू आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचीत अध्यक्ष समृद्धी खाडे यांनी आगामी काळात सदस्यांची व्यावसायिक कौशल्य वाढ, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक कार्य इत्यादी विषयी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.



