मराठी

त्यांच्या आयुष्यात आली मांगल्याची पहाट.

Spread the love

रागाच्या भरात अजाणते पणे झालेल्या चुकीमुळे त्यांना तारुण्यात कारागृहात जावे लागले. जीवनातील ऐन उमेदीचा काळ हा कारागृहातील नकारात्मक वातावरणात गेला .आजूबाजूला सगळे गुन्हेगार ,नकारात्मक वातावरण . पण या वातावरणात राहून सुद्धा त्यांनी कारागृहातील वेळ चित्रकला शिकण्यात घालवला. अर्थात यासाठी त्यांना मदत मिळाली ती कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांची. कॅनव्हास, रंग, ब्रश यांनीच त्यांची जन्मठेपे मध्ये साथ केली .
चित्रकला आणि लेखन या दोन कला आत मध्ये राहून बहरल्या. त्यांची जन्मठेप काही प्रमाणात सुसह्य झाली आणि बाहेर आल्यानंतर त्यांची कलाच त्यांच्या उज्वल भवितव्याची साधन बनली.
अनिल आणि सुनील (नाव बदलले आहे )या दोघांची मैत्री कारागृहात झाली. अनिल चित्र काढतो आणि सुनील त्याच चित्रावर लेख लिहितो.
कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर जर त्यांच्या हाताला काम मिळाले नाही , प्रेम मिळाले नाही तर हे कैदी पुन्हा गुन्हेगारीकडे जातात. असे होऊ नये म्हणून गेली अनेक वर्ष पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने प्रेरणापथ हा प्रकल्प सुरू आहे.
बाहेर आल्यानंतर आल्यानंतर मुक्त बांधवांनी त्यांचे जीवन सन्मानाने जगावे, चांगले काम करावे , पुन्हा गुन्हेगारीकडे जाऊ नये यासाठी या प्रकल्पाद्वारे या मुक्त बांधवांना रोजगार आणि नोकरी उपलब्ध करून देण्यात येते.आतापर्यंत 42 मुक्त बांधवांनी याचा लाभ घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून या दोन मुक्त बांधवांच्या कलेचे प्रदर्शन पुण्यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे आयोजित करण्यात आले होते.
बाल गुन्हेगारी, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन ,बुवाबाजी, स्त्रीभ्रूणहत्या, आपल्या प्रथा परंपरा, बालमुजरी , पर्यावरण अशा विविध विषयांवर ही चित्रे आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात असा अनुभव येतो .

त्यांच्या या नवीन आयुष्याचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्राच्या नगरविकास ,परिवहन, सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरीताई मिसाळ ,महाराष्ट्र कारागृह प्रशासन अपर पोलीस महासंचालक श्री सुहास वारके, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री विनय सहस्त्रबुद्धे, विशेष पोलीस महानिरीक्षक सी आय डी, श्री सुधीर हिरेमठ,विशेष कारागृह निरीक्षक श्री योगेश देसाई, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, विशेष पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, ज्येष्ठ विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, पुणे बार
असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड, विशेष पोलीस उप महानिरीक्षक ( निवृत्त) श्री चंद्रशेखर दैठणकर, येरवडा कारागृह अधीक्षक श्री सुनील ढमाळ, येरवडा खुले कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे, चित्रकार गिरीश चरवड, शिल्पकार विवेक खटावकर, ज्येष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ.मिलिंद भोई यांनी या मुक्त बांधवांना समाजात ताठ मानेने जगता यावे यासाठी प्रेरणापथ हा प्रकल्प पथदर्शी ठरला असून संपूर्ण राज्यभरातील कारागृहांमध्ये मुक्त बांधव याचा लाभ घेत असल्याचे सांगितले. पुणेकरांनी या दोन मुक्त बांधवांच्या कलेला उत्स्फूर्त दाद देऊन त्यांच्या पाठीवर समाधानाची थाप मारली आहे त्यातून त्यांचे नवीन आयुष्याचा शुभारंभ झाला आहे अशी माहिती दिली.
आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी आतापर्यंत अनेक मुक्त बांधवांनी बाहेर येऊन वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आपली सकारात्मक आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट असून या प्रकल्पाची व्याप्ती वाढवणे साठी विविध मान्यवर सहभागी होत आहेत असे सांगितले.
स्व.बाळासाहेब ठाकरे कला दालन येथे संपन्न झालेल्या या प्रदर्शनाला दोन दिवसांमध्ये असंख्य पुणेकरांनी भेट देऊन या दोन मुक्त बांधवांचा उत्साह वाढवला.

स्थळ- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कालादालन ,बाजीराव रोड, सणस ग्राउंड समोर , पुणे
सोबत फोटो
कारागृहातून शिक्षा बाहेर शिक्षा बघून बाहेर पडलेल्या मुक्त बांधवांच्या चित्रकला प्रदर्शनाची पाहणी करताना अपर पोलीस महासंचालक- कारागृह प्रशासन, महाराष्ट्र राज्य श्री सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक, सी आय डी श्री सुधीर हिरेमठ,विशेष कारागृह उपमहानिरीक्षक श्री योगेश देसाई आणि मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!