मराठी

मचंर येथे ७३ वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क

देशाची लोकशाही बळकटीकरणाकरिता मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन

Spread the love

पुणे, : नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता आज जिल्ह्यात मतदान सुरु आहे; बिबट्याची दहशत असतांना अलका दोशी या ७३ वर्षीय आजीने न घाबरता मंचर नगरपंचायत प्रभाग ४ अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, लोंढेमळा या मतदान केंद्रावर सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला, देशाची लोकशाही बळकटीकरणाच्याकामी बिबट्याची दहशत बाळगण्याची गरज नाही, मतदारांनी पुढे येवून मतदान करावे, असे आवाहन अलका दोशी यांनी केले आहे.

श्रीमती दोशी म्हणाल्या, मतदान करणे हा आपला हक्क आहे, निवडून येणाऱ्या सदस्यांना मतदार म्हणून आपण हक्काने विकास कामे करण्याबाबत सांगू शकतो. लोकशाहीकरिता आपण काहीतरी केले पाहिजे, या भावेनेने मतदारांनी पुढे येवून मतदानांचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन श्रीमती अलका दोशी म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!