स्वातंत्र्य पुर्व देशातील ‘दारिद्र्याची नोंद घेत, अंगावरील सुटबुट उतरवून, पंचा धारण करणारे मोहनदास गांधी देशाप्रती समर्पित भावना जोपासल्यामुळे महात्मा व राष्ट्रपिता झाले..! – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी
गांधी - नेहरू जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा या मुलांच्या विकासाला चालना देणाऱा व देशाच्या ऊभारणीचे वास्तवतेचे भान देणाऱा स्तुत्य उपक्रम..!

बालकांप्रती आत्मियतेने वागणारे पं. नेहरूंचे व्यक्तिमत्व मानवतेचा साक्षात्कार देणारे होते..!
पुणे दि २१ डिसेंबर – स्वातंत्र्यसेनानी, देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू देशातील बालकांना देशाचे भविष्य’ समजुन, ‘आजची मुले उद्याचा भारत’ असे म्हणत असत. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि स्वातंत्र्यपूर्ण विचार हे राष्ट्र उभारणीचे मूळ समजत आणि म्हणूनच समस्त ‘विविध जाती, धर्मिय समस्त बालकांप्रती आत्मियते’ने वागणारे पं नेहरूंचे व्यक्तिमत्व मानवतेचा साक्षात्कार देणारे होते असे वक्तव्य काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
राजीव फाऊंडेशन व जे के अबॅकस कोचींग क्लासेस, लोहगाव पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व पं. नेहरू यांच्या जयंती निमित्त, लहान मुलांसाठी Drawing & Coloring स्पर्धा व abacus मधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विजेत्या मुलांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मुलांचे लाडके पं. नेहरू हे मुलांशी जिव्हाळ्याने वागत होते. लहान मुले म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता. त्यामुळेच त्यांना “चाचा नेहरू” असेही म्हटले जात व नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य पुर्व देशातील ‘दारिद्र्याची नोंद घेत, अंगावरील सुटबुट उतरवून, पंचा धारण करणारे मोहनदास गांधी देशाप्रती समर्पित भावना जोपासल्यामुळे महात्मा व राष्ट्रपिता झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच गांधी – नेहरू जयंती निमित्त’च्या चित्रकला स्पर्धा या मुलांच्या विकासा’ला चालना देणाऱा व प्रजासत्ताक भारताच्या ऊभारणीचे वास्तवतेचे भान देणाऱा स्तुत्य उपक्रम असल्याचे ही काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन आपल्या भाषणात म्हणाले की, सध्याचे सत्ताधारी धर्मनिरपेक्ष भारतास जातीय – धर्मांधतेच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्नात आहेत. राम मंदीरातील गाभाऱ्यात महामहीम राष्ट्रपतींना जाऊ न देणे हे मनुवादी मानसिकतेचे व संविधान विरोधी लक्षण आहे. जनतेने देशाचे भवितव्य डोळ्यांसमोर ठेवून सरकार व लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता घेणे हीच खऱ्या लोकशाहीची गरज आहे.
स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसनेते गोपाळदादा तिवारी (वरिष्ठ प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना नेते (उबाठा) अमोल पवार, व सुभाषशेठ थोरवे यांनी उपस्थित राहून पाल्यांना व पालकांना मौलीक मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक राजीव फाऊंडेशन अध्यक्ष सलीम शेख व शबीना शेख सह सर्वश्री संतोष गुंजकर, स्वाती गुंजकर, जावेद शेख, नंदकुमार पापळ, गणेश मोरे, सुरेश खोबरे, उत्तम बोरूडे, चंद्रकांत कांबळे, किशोर शिंदे, निलेश पिसे इ मान्यवर उपस्थित होते.



