पुणे महानगर पालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा ‘सनी निम्हण’

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परदेशात शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधणारा एक आश्वासक व्यक्तिमत्व आहे. औंध–बोपोडी प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना असून, त्यांना जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. यंदा ते प्रभाग क्रमांक ८ – औंध बोपोडी येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.
वडील दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेले सनी निम्हण हे सुरुवाती पासूनच अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आहेत. अभ्यास, खेळ, समाजकारण या सगळ्यातच त्यांचा हातखंडा. सनी यांचे शालेय शिक्षण एस.एस.पी.एम.एस आणि मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल झाले आहे. एमआयटी मधून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ‘कन्स्ट्रक्शन अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट’मध्ये एम.एस. करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील जागतिक कीर्तीच्या मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये सनी निम्हण यांना प्रवेश मिळाला. विशेष बाब म्हणजे हा प्रवेश त्यांना स्कॉलरशिपसह मिळाला.
वडील दिवंगत आमदार विनायक निम्हण हे राज्यातील मान्यवर व्यक्तिमत्त्व असले तरी, मुलामध्ये शिक्षणाची किंमत, कष्टाचे महत्त्व आणि आत्मनिर्भरतेची जाणीव कायम राहावी, या उद्देशाने त्यांनी परदेशी शिक्षणासाठी सनी यांना एज्युकेशन लोन घेण्याचा सल्ला दिला. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर सनी निम्हण यांनी ते कर्ज पूर्णपणे फेडून जबाबदारीची प्रगल्भता दाखवून दिली. ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत असताना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सनी निम्हण दररोज चार तास काम करत होते. दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी शिक्षण, काम आणि अनुभव यांचा योग्य समतोल साधत स्वतःला घडवले.
उच्चशिक्षणानंतर भारतात परतलेले सनी विनायक निम्हण हे आज पुण्यातील एक प्रभावी तरुण राजकीय व सामाजिक नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक-राजकीय वारसा पुढे नेत औंध परिसराचे नगरसेवक म्हणून प्रभावी आणि परिणामकारक कामगिरी केली आहे.
शहरी विकास, युवा सक्षमीकरण, महिला उत्थान, उद्योजकता, क्रीडा विकास तसेच स्वच्छ शहरांच्या संकल्पनेवर त्यांचा विशेष भर आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंटमधील आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा उपयोग करून ते विकासाभिमुख योजना प्रभावीपणे राबवत आहेत. खुले प्रशासन, संवेदनशील नेतृत्व आणि परिणाम-केंद्रित कार्यपद्धती ही त्यांची ओळख ठरली आहे. विनायकी शिष्यवृत्ती च्या माध्यमातून त्यांनी सामजिक भान जपले आहे तर सनीज् वर्ल्ड मधून त्यांची उद्योजक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मोफत महा-आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज पर्यंत दीड लाखाहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम सनी निम्हण यांनी केले आहे.


