एसके करंडक’ १३ वर्षाखालील आंतरक्लब टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
पुणे पोलिस बॉईज, स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत !!

सातारा रोडवरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुज खराडे याने केलेल्या ५२ धावांच्या मदतीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघाचा ९६ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबने १९.५ षटकात २०४ धावांचा डोंगर उभा केला. अनुज खराडे याने ३६ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने झैद काझी (४१ धावा), संकर्षण खांडेकर (३७ धावा) आणि इशान माळी (२६ धावा) यांनीही धावा जमविल्या आणि संघाची धावसंख्या दोनशेच्या पुढे गाठून दिली. याला उत्तर देताना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा डाव १०८ धावांवर आटोपला. स्पेशलाईज्ड क्लबच्या सार्थक काळे याने तीन गडी टिपले. स्टीफन शिरोडकर, प्रत्युश निवंगुणे आणि आदेश राऊत यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.
स्वराज पिसाळ याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे (२९ धावा व १ विकेट) पुणे पोलिस बॉईज संघाने योगेश इलेव्हनचा दोन धावांनी निसटता पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पुणे पोलिस बॉईज संघाने १६० धावा धावफलकावर लावल्या. विराट भिसे याने सर्वाधिक ४८ धावा केल्या. यांसह स्वराज पिसाळ (२९ धावा), वेदांत मावस्कर (२६ धावा) आणि समर्थ कदम (२१ धावा) यांनी धावा जमवून साथ दिली. हे लक्ष्य गाठताना योगेश इलेव्हनचा डाव १५८ धावांवर संपुष्टात आला. स्वरीत नारूळे याने ४० चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५३ धावांची खेळी केली. करण सरकार याने ४० धावांचे योगदान दिले. नील सोलापुरे आणि स्वराज पिसाळ यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः १९.५ षटकात १० गडी बाद २०४ धावा (अनुज खराडे ५२ (३६, ८ चौकार), झैद काझी ४१, संकर्षण खांडेकर ३७, इशान माळी २६, इशान जाधव २-१५) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः १६.५ षटकात १० गडी बाद १०८ धावा (कौस्तुभ सुतार २५, शुभम वाडेकर १९, सार्थक काळे ३-१२, स्टीफन शिरोडकर २-५, प्रत्युश निवंगुणे २-१८, आदेश राऊत २-१९); सामनावीरः अनुज खराडे;
पुणे पोलिस बॉईजः २० षटकात ७ गडी बाद १६० धावा (विराट भिसे ४८, स्वराज पिसाळ २९, वेदांत मावस्कर २६, समर्थ कदम २१, अथर्व शिंदे २-२२) वि.वि. योगेश इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १५८ धावा (स्वरीत नारूळे ५३ (४०, ७ चौकार, १ षटकार), करण सरकार ४०, नील सोलापुरे १-२०, स्वराज पिसाळ १-२५); सामनावीरः स्वराज पिसाळ.


