माजी खासदार सुरेश कलमाडी यांना ना. चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली
पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले- ना. चंद्रकांतदादा पाटील

पुण्याचे माजी खासदार आणि कॅंाग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज दुःखद निधन झाले. ना. पाटील यांनी आज सुरेश कलमाडी यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
पुण्याच्या सामाजिक आणि सार्वजनिक जडणघडणीत सुरेश कलमाडी यांचे योगदान महत्त्वाचे होते. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात त्यांनी भर घातली. तसेच, बालेवाडी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दांत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहर कार्यालयात सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



