चुनावब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
युवक आघाडी अध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश
कोथरुड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

कोथरुड मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोथरुडचे युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी बुधवारी रात्री भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, महेश पवळे, संतोष बराटे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची भावना यावेळी प्रमोद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


