वानवडी येथील शिंदे छत्री येथे २६६ वा पानिपत शौर्यदिन साजरा होणार

पुणे, : पानिपतचा पराभव मिटवून मराठा साम्राज्याचा मान उंचावणारे थोर सेनानी श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २६६ वा पानिपत शौर्यदिन बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महादजी शिंदे छत्री, वानवडी, पुणे येथे श्रद्धा व उत्साहात साजरा होणार आहे. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.
पानिपत शौर्यदिन समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, समितीचे प्रमुख मा. उत्तमराव पांडूरंगराव शिंदे सरकार (सुप्रसिद्ध समाजसेवक व उद्योजक) यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ञ, विचारवंत, समाजसेवक, सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात पानिपतच्या पवित्र भूमीतील मातीच्या मंगल कलशाचे पूजन, तसेच श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पानिपत युद्धातील शुरवीरांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून
मा. सतीश राऊत (अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे), मा. यशवंतजी माने (प्रांताधिकारी, पुणे), मा. अजयजी केसरी (इन्कम टॅक्स कमिशनर, पुणे), मा. सदानंद मोरे (जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज), मा. बुधाजीराव मुळीक (ज्येष्ठ कृषी तज्ञ), जयंतजी जप्पे (शिंदिया देवस्थान, ग्वाल्हेर), मा. महेंद्र पिसाळ (सी.ई.ओ., सकाळ समूह), मा. उदयजी शिंदे सरकार (सिंहगड रोपवे प्रमुख), मा. प्रदीप देशमुख (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे), मा. रितेश शिंदे (उपायुक्त, पुणे मनपा) यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश दळवी करणार असून, आयोजनासाठी मा. मोहनराव शिंदे सरकार, मा. उमेश शिंदे, मा. यशवंत भोसले (शिंदिया देवस्थान, वानवडी) तसेच पानिपत शौर्यदिन समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.



