मराठीमहाराष्ट्रशहर

पिंपरी पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात ‘महाआरोग्य अभियान’ची सुरुवात

वंचितांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा सवलतीत उपलब्ध

Spread the love

• १५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान भव्य आरोग्य मोहीम; ओपीडी व आयपीडी सेवांवर ५० टक्के सवलत
• मोफत मोतीबिंदू, कर्करोग तपासणी, प्रसूती सेवा; अँजिओग्राफी फक्त रु. ३९९९ मध्ये
• समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपक्रम; नामवंत मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

पिंपरी, पुणे, २३ फेब्रुवारी २०२६ : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्या वतीने ‘महाआरोग्य अभियान ’ या भव्य आरोग्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती – १७ फेब्रुवारी), मा. डॉ. स्मिता जाधव (प्र-कुलगुरू व सचिव – १७ फेब्रुवारी) तसेच मा. डॉ. यशराज पी. पाटील (विश्वस्त व कोषाध्यक्ष – १९ फेब्रुवारी) यांच्या जन्मदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही आरोग्य मोहीम मा. डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे प्र-कुलपती मा. डॉ. सोमनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत आहे.

ही दोन आठवड्यांची आरोग्य मोहीम दि. १५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पिंपरी पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, येथील हाय-टेक मधील बेसमेंट ओपीडी परिसरात आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश विशेषतः वंचित व दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा समान व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा असून, समुदाय आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीबाबत संस्थेची कटिबद्धता यामधून अधोरेखित होत आहे.

या उपक्रमांतर्गत लाभार्थींना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम तसेच राज्य रक्त संक्रमण कार्यक्रम या योजनांअंतर्गत ओपीडी तपासण्या आणि आयपीडी उपचारांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. अभियानादरम्यान सर्व प्रकारच्या लहान व मोठ्या शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी व हृदय शस्त्रक्रिया, बालरोग व बालहृदय शस्त्रक्रिया, जन्मजात विकारांवरील शस्त्रक्रिया (उदा. ओठातील भेग), स्क्विंट शस्त्रक्रिया तसेच कॉक्लिअर इम्प्लांट यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया (मोफत), गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी (पॅप स्मिअर) (मोफत), स्तन कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) तसेच सामान्य व सिझेरियन प्रसूती या सेवा मोफत देण्यात येणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून अँजिओग्राफी केवळ रु. ३९९९ या सवलतीच्या दरात करण्यात येणार असून भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

ही मोहीम विशेषतः समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळावा या उद्देशाने राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पांढरा, केशरी किंवा पिवळा रेशनकार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) कार्ड, आधारकार्ड तसेच पूर्वीच्या वैद्यकीय उपचारांचे अहवाल अशी वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

या महाआरोग्य अभियानाविषयी आपले मत मांडताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापिठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे कुलपती, मा. डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले, “हा उपक्रम आपल्या समाजाच्या आरोग्य व कल्याणासाठी असलेल्या आमच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. अशा मोहिमांद्वारे गरजूंपर्यंत परवडणाऱ्या व सुलभ आरोग्यसेवा पोहोचविण्याचे आमचे ध्येय आम्ही सातत्याने जपतो.”

तसेच मा. डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांनी नमूद केले की, “महाआरोग्य अभियानांतर्गत आम्ही केवळ वैद्यकीय सेवा नव्हे, तर ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांना आशा आणि आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारे समाजसेवा करणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.”

मा. डॉ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे यांच्या सचिव यांनी सांगितले की, “सुसंघटित सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमुळे आरोग्यसेवा अधिक सुलभ होते, रोगांचे लवकर निदान साध्य होते आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवांची परिणामकारकता वाढते. उपचारांवरील आर्थिक अडथळे कमी करून अशा उपक्रमांमुळे आरोग्य परिणामात लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होते तसेच वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समतोल आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास हातभार लागतो.”

मा. डॉ. यशराज पी. पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांनी अधोरेखित केले की, “महाआरोग्य अभियान हे समाजसेवेबाबतच्या आमच्या संस्थेच्या कटिबद्धतेचे उदाहरण आहे. दर्जेदार आरोग्यसेवा समाजातील अगदी वंचित घटकांपर्यंत पोहोचवून अधिक निरोगी आणि समतोल भविष्य घडविण्याचा आमचा संकल्प आहे.”

डॉ. एच. एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे हे महाआरोग्य अभियानाच्या एकूण नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीवर देखरेख ठेवत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम शिस्तबद्ध व परिणामकारकरीत्या राबविण्यात येत आहे, ज्यामुळे अभियानाचे लाभ समाजातील अपेक्षित घटकांपर्यंत सातत्याने व प्रभावीपणे पोहोचत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!