खेलमराठीशहर

लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ चौथी ‌‘लायन्स्‌‍ प्रौढ करंडक‌’ टी-२० क्रिकेट २०२६ स्पर्धा !!

नायर नाईट रायडर्स, अनिलदादा फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी !!

Spread the love
पुणे, ६ एप्रिलः स्पोर्ट्‌‍सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या ‌‘लायन्स्‌‍ प्रौढ करंडक‌’ (४० वर्षावरील) टी-२० क्रिकेट स्पर्धेत नायर नाईट रायडर्स आणि अनिलदादा फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पराग चितळे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या मदतीने नायर नाईट रायडर्स संघाने रिस्क्राईब संघाचा ५ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या रिस्क्राईब संघाने २० षटकात १३४ धावांचे लक्ष्य उभे केले. मिथुन किराड (नाबाद ३१ धावा), संतोश पुणेकर (२३ धावा) आणि राहूल कामठे (२१ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. पराग चितळे याने १८ धावांत तीन गडी बाद केले. सचिन कापडे याने २४ धावात दोन गडी टिपले. हे लक्ष्य नायर नाईट रायडर्सने १७ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. श्रीनिवास सरवदे (नाबाद ३९ धावा), निलेश चौधरी (३४ धावा) आणि सुदर्शन गुणे (२० धावा) यांनी धावा जमवून संघाचा विजय सोपा केला.

राजु जाधव याने केलेल्या ६२ धावांच्या मदतीने अनिलदादा फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने ब्रेव्हहार्ट वेटरन्स्‌‍ संघाचा पाच धावांनी निसटता पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अनिलदादा फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने १८७ धावा धावफलकावर लावल्या. राजु जाधव याने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावा चोपल्या. शेखर दालमिया (३८ धावा), सुनिल गोपीशेट्टी (३१ धावा) आणि गोपाळ गोरखुडे (२० धावा) यांनी धावसंख्येला हातभार लावला. या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रेव्हहार्ट वेटरन्स्‌‍ क्लबचा डाव १८२ धावांवर मर्यादित राहीला. प्रभात सिंग याने ५२ धावांची तर, गुरू कुमार (३९ धावा) आणि नेल्सन ॲरीक (नाबाद ३९ धावा) यांनी धावा जमवून जोरदार प्रतिकार केला परंतु, संघाचा विजय पाच धावांनी दूर राहीला.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
रिस्क्राईबः २० षटकात ७ गडी बाद १३४ धावा (मिथुन किराड नाबाद ३१, संतोश पुणेकर २३, राहूल कामठे २१, पराग चितळे ३-१८, सचिन कापडे २-२४) पराभूत वि. नायर नाईट रायडर्सः १७ षटकात ५ गडी बाद १३८ धावा (श्रीनिवास सरवदे नाबाद ३९, निलेश चौधरी ३४, सुदर्शन गुणे २०, अमित सिंग १-१८, सचिन थोपटे १-२१); सामनावीरः पराग चितळे;

अनिलदादा फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १८७ धावा (राजु जाधव ६२ (३१, ५ चौकार, ५ षटकार), शेखर दालमिया ३८, सुनिल गोपीशेट्टी ३१, गोपाळ गोरखुडे २०, राहूल अगरवाल २-३०) वि.वि. ब्रेव्हहार्ट वेटरन्स्‌ः २० षटकात ५ गडी बाद १८२ धावा (प्रभात सिंग ५२ (३१, ५ चौकार, ३ षटकार), गुरू कुमार ३९, नेल्सन ॲरीक नाबाद ३९, गोपाळ गोरखुडे ३-२६); सामनावीरः राजु जाधव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!