आळंदी पोलीस स्टेशन शांतता कमेटी बैठकीत आवाहन
डॉ. आंबेडकर जयंती उत्साही शांततेत साजरी करावी :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आळंदी पंचक्रोशीतील धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत सर्वानी उत्साही शांततेत विविध उपक्रमांनी साजरी करावी. कार्यक्रमांना दरम्यान तसेच मिरवणुकीस सर्वतोपरी पोलीस बंदोबस्त आणि सहकार्य आळंदी पोलीस स्टेशनचे वतीने केले जाईल. मात्र मिरवणुकांची सांगता हि लवकर मिरवणुका सुरु करून वेळेचे मर्यादेत करावी असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केले.

आळंदी पोलीस स्टेशनचे सभागृहात आळंदी शांतता कमेटीचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करणारे सर्व घटक युवक, तरुण, आजी माजी पदाधिकारी, आळंदी पंचक्रोशीतील पदाधिकारी यांचे उपस्थितीत झाली. या वेळी अध्यक्ष पद वरून मार्गदर्शन करताना आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके बोलत होते.
या बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, शांतता कमेटीचे पदाधिकारी डी.डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, उत्तम गोगावले, अर्जुन मेदनकर, अजित वडगावकर, संदीप रंधवे, डॉ.निलेश रंधवे, आनंदराव मुंगसे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, हमीद शेख, सोहेल शेख, निसार सय्यद, यांचेसह आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत गावांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके यांनी उपस्थित मंडळांचे पदाधिकारी, समिती सदस्य, जयंती उत्सवांचे संयोजकांचे नियोजन, कार्यक्रम, मिरवणुकांचे स्वरूप आदींची माहिती जाणून घेत संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वानी मिळून सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखत जयंती साजरी करण्याचे आवाहन करीत मार्गदर्शन केले. मिरवणुका, प्रतिमा पूजन, दिवसभरातील कार्यक्रम, रक्तदान, संविधान जागर अभियान आदी सामाजिक उपक्रम या निमित्त होत असल्याचे बैठकीत जाणून घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आळंदी पंचक्रोशीतील प्रथा परंपरा आणि धार्मिक महत्त्व लक्षांत घेऊन उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करीत त्यांनी संवाद साधला. मिरवणुका दरम्यान सर्वानी सतर्क राहून शांततेत तसेच निर्धारित वेळेत मिरवणुका सांगता होण्यासाठी मिरवणुका सुरु करताना लवकर सुरु कराव्यात असे सांगता मिरवणुकांमध्ये प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूला सतर्क राहून कोणत्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दक्षता घ्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वानी मिळून उत्साही आनंदी वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजनातून साजरी करताना सामाजिक सलोखा कायम राहील याची दक्षता सर्वानी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. या वेळी मिरवणुका या 14 ते 20 एप्रिल या काळात होत असल्याचे निदर्शनात आले. या वर मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके म्हणाले, शक्यतो मिरवणूक या 14 एप्रिल ला संयोजकांनी आयोजित कराव्यात. 14 एप्रिल रोजी मिरवणुकांना रात्री 12 पर्यंत परवानगी आहे. इतर दिवशी मात्र मिरवणूक या रात्री 10 वाजे पर्यंत परवानगी राहणार आहे. त्यामुळे मिरवणुकांना अधिक वेळ मिळण्यासाठी आपापल्या गावांत 14 एप्रिल रोजीच मिरवणुका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या साठी परवानगी आणि पोलीस बंदोबस्त दिला जाईल. या वेळी जयंती निमित्त मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान, सांस्कृतिक उपक्रम या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांत लोकसहभाग आणि उपस्थिती याचा विचार करून मार्गदर्शन करण्यात आले. संयोजकांचे सुहाना, माहिती नुसार कार्यवाही करून कायदा, शांतता, सुव्यवस्था, सुरळीत वाहतूक, फटाक्यांचे आतिषबाजी, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केले.
या वेळी नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करावी. आळंदी नगरपरिषदेचे सहकार्य कायम राहील. नगरपरिषदेत देखील आयोजित जयंती कार्यक्रमात सर्वानी उपस्थित राहावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, शिक्षण, संघटन , संघर्ष या मूल्यांवर आधारित त्यांचे विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपापल्या भागात समाजाचा विकास साधण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे विचार सर्व समाजा पर्यंत नेऊन समाजातील सर्व घटका पर्यंत पोहोचले पाहिजे. जयंती दिन हा समाज प्रबोधन दिन म्हणून सर्वानी साजरा करावा असे आवाहन नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांनी केले. या वेळी माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले पाटील, संदीप रंधवे, अर्जुन मेदनकर, प्रकाश कुऱ्हाडे पाटील, डॉ. निलेश रंधवे, विविध गावांतील संयोजन यांनी मनोगते व्यक्त करीत बैठकीत सहभाग घेतला.
या बैठकीत श्री रामनवमी निमित्त आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी येथे आयोजित श्री रामाची पालखी मिरवणूक आणि श्री राम मंदिरात श्री राम जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त आळंदी पोलिस स्टेशनचे वतीने बंदोबस्त देऊन जन्मोत्सव व श्रींची पालखी मिरवणूक उत्साही आनंदी आणि धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात सांगता झाली. या साठी आळंदी पोलिस स्टेशन तर्फे पोलिस बंदोबस्त देऊन सहकार्य केल्या बद्दल आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांचा सत्कार विश्वस्त अर्जुन मेदनकर, शांतता कमेटी सदस्य माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी. भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सुत्रसंचलन निसार सय्यद यांनी केले. बैठकीचे यशस्वीतेसाठी पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आणि आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी यांनी परिश्रम पूर्वक नियोजन केले.



