खेलब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धा

डाॅ.विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंना रौप्यपदक

Spread the love

पुणे : चंदीगड येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे अंतर्गत कार्यरत डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरीसह रौप्यपदक पटकावित संस्थेचा गौरव वाढविला आहे.
देशभरातील ३० विद्यापीठांच्या संघांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत अकादमीच्या संघाने दमदार प्रदर्शन केले. एलएम४ मायनस (लाईट मेन कॉक्सलेस फोर) या २००० मीटर शर्यतीत संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक पटकाविले. विजयी संघात योगेश ललित बोरोले, अनिकेत सुरेश कोलते, यशराज पोपट गायकवाड आणि स्वराज आघव यांचा समावेश होता. खेळाडूंनी दाखविलेला समन्वय, चिकाटी आणि मेहनतीमुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशामागे राष्ट्रीय रोईंग प्रशिक्षक संदीप भापकर यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण, नियोजन आणि अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!