ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार 2026 जाहीर

Spread the love

मुंबई- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा – २०२६’ अंतर्गत देण्यात येणारे ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या जडणघडणीत आणि समाजकार्यात निस्वार्थ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा, तसेच संस्था व संघाचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कृतज्ञता सन्मान दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.

या वर्षीच्या कृतज्ञता सन्मानामध्ये महिला विभागातून नवी मुंबई (रायगड) येथील वृषाली मगदुम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने व ठाणे येथील बबन पाटणकर यांची निवड करण्यात आली आहे , तर दिव्यांग प्रवर्गातून पुणे येथील मानव कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ अंतर्गत सन्मानार्थी संघ म्हणून जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सन्मानार्थी संस्था म्हणून पुणे येथील जनसेवा फाउंडेशन यांची निवड करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या या ज्येष्ठ मान्यवरांचा व संस्थांचा यथोचित गौरव या आनंद मेळाव्यात करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!