
पुणे.ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 18व्या भीमथडी जत्रेमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील महिलांच्या उत्पादनांना मोठी बाजार पेठ उपलब्ध करून दिली आहे. या मध्ये सिद्धटेकच्या बचत गटाची सुती व हाताने शिवलेली गोधडी, लाईट वरील कास्त पायाची मसाज थाळी. पोळपाट लाटणे, कोळवडीची प्रसिद्ध हळद, बेलगावचे वाळवन पदार्थ, सेंद्रिय घाणा तेल, भाजीपाला पावडर, हॅन्डमेड चॉकलेट, कापडी फॅब्रिकवरील हॅन्ड पेंटिंग, धूप , कापूर , अगरबत्ती, फुल वाती, सिद्धटेकचे फेमस लेदर वर्क, भीमथडी सिलेक्ट मधील हस्तकलेच्या विविध वस्तू, विविध शेतकरी उत्पादक कंपण्यांचे सेंद्रिय पदार्थ, मिलेटची आइस्क्रीम, सोलापूरची प्रसिद्ध ज्वारी, गृहउपयोगी लाकडीवस्तू, कापडापासून बनविलेल्या श्रृंगारीक वस्तू, सुतळी व लोकरीच्या वस्तू, दीपस्तंभ मनोबल फाँडेशनच्या दिव्यांग मुलांच्या माध्यमातून बनविलेली दोऱ्याच्या विविध कलाकृती, गिर गायीच्या शेणापासून तयार केलेल्या आकर्षक वस्तू, स्वराज गुळपट्टी, चाळीसगावचे प्रसिद्ध मडक्यावरील मांडे, मासवडी, रगडा पापड, शेंगुळी, झुणका भाकरी , गुळभेंडी हुरडा, दही थालीपीठ, खपली गव्हाची खीर यासह मांसाहारी पदार्थाचे विवध स्टॉल यासर्वांचा भिमथडीत चांगला व्यावसाय होत असून अनेक छोट्या मोठ्या बचत गटांना भिमथडीच्या माध्यमातून रोजगार उपलब्धतेच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. काल सोमवार असला तरी पुणेकरांची पावले भीमथडीच्या दिशेने वळताना दिसत होती. दिनांक 25 डिसेंम्बर पर्यंत चालणाऱ्या या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.