
पुणे . महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल आता समोर येत आहेत. महाराष्ट्रात 2014 पेक्षा भाजपची मोठी लाट आल्याचं दिसत आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता जवळपास अर्ध्या जागांचे निकाल आता समोर आले आहेत. यामध्ये काही जागांवरील चित्र स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा विजय निश्रि्चत झाला आहे. 29 फेर्यांपैकी 24 फेर्यांमधील मतमोजणीनुसार सुनील शेळके यांना 95 हजारांपेक्षा अधिक लीड घेतले असून सुनील शेळके आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये सुनील शेळके यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं दिसत आहे. मावळ मतदारसंघात सुनील शेळके यांच्याविरूद्ध अण्णा भेगडे मैदानात होते. महाविकास आघाडीने भेगडे यांना पाठिंबा दिला होता. बंडखोरी केलेल्या अण्णा भेगडे शरद पवार गटानेही पाठिंबा दिला होता. मात्र जनतेने सुनील शेळके यांच्या बाजूने कौल दिलाय.
यंदाच्या निवडणूकीमध्ये जनतेने महायतीला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं आहे. महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला अपयश आल्याचं दिसून आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला आहे. महिलांची एकगठ्ठा मते महायुतीच्या उमेदवारांना मिळालीत. सुनील शेळके आणि भेगडे यांच्यात चुरशीची निवडणूक होईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र शेळकेंनी एकतर्फी विजय मिळवत वन साईड बाजी मारली.