खेलताजा खबरपुणे

संविधान सन्मान दौड 2025 च्या जर्सीचे अनावरण

Spread the love

पुणे .  भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2025 ’ चे आयोजन येत्या 25 जानेवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग , सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉन मध्ये पुणेकरांसह देश , विदेशातील सुमारे 10 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. संविधान सन्मान दौड 2025 च्या जर्सीचे अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष व ‘संविधान सन्मान दौड’ चे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे ( विभाग प्रमुख संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के, विजय सोनिगरा आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, संविधान सन्मान दौड चे यंदा तिसरे वर्ष आहे, मागील वर्षी प्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे नांव नोंदणी मधुन दिसते. येत्या 25 जानेवारी रोजी संविधान सन्मान दौड ची सुरुवात सकाळी 5.30 वा. सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी Preamble to the Constitution of India (भारतीय संविधानाची उद्देशिका) वाचन होणार आहे, स्पर्धेचे पारितोषिक वितरण सकाळी 8 वा.  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सामजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टी चे महासंचालक डॉ. सुनिल वारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,  पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा,  प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, रजिस्टार ज्योती भाकरे, डॉ. विजय खरे ( विभाग प्रमुख संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.

आत्तापर्यंत चार हजार स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. उद्या (22 जाने) पासून 24 जानेवारी पर्यंत दुपारी 2 ते 6 या वेळेत तथागत गौतम बुद्ध विपश्यना केंद्र, पुणे (पुणे विद्यापीठ, जोशी गेट शेजारी) येथे या जर्सी चे वाटप केले जाणार आहे. तेव्हा ज्या स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे त्यांनी या जर्सी घेवून जाव्यात असे आवाहन  परशुराम वाडेकर यांनी यावेळी केले.

डॉ. विजय खरे म्हणाले, इतर मॅरेथॉन पेक्षा ही स्पर्धा वेगळी आहे. यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. मागील वर्षी प्रमाणे यंदाही 40 देशांमधील स्पर्धक यामध्ये सहभागी होतील, अशी आशा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही अमृत महोत्सवी आंतरराष्ट्रीय संविधान दौड स्पर्धा ठरणार आहे. संविधान सन्मान दौड मध्ये अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. पराग काळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!