पंचायत समिती खेड आरोग्य विभाग यांचे वतीने मोठ्या उत्साहात आशा दिन साजरा
उत्कृष्ट कार्यास सन्मान प्रदान

आळंदी . पंचायत समिती खेड आरोग्य विभाग यांचे वतीने मोठ्या उत्साहात आशा दिन साजरा करण्यात आला. यावेळी आशा सेविका ३२० पेक्षा जास्त आशा कार्यकर्ती आणि १७ आशा गटप्रवर्तक उपस्थित होते. यवत सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या तालुका स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रथम आशा कार्यकर्ती यांचा सन्मान करण्यात आला . तालुका स्तरावरील प्रथम व इतर सर्व गट प्रवर्तक यांचा उत्कृष्ट काम केल्या बद्दल सन्मान करण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुका समुह संघटक निलेश बेलवटे यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम झाला. खेड तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६० आरोग्य उपकेंद्र या माध्यमातून सर्व आशांची लक्षणीय उपस्थिती ने दाद दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. इंदिरा पारखे, तालुका कार्यालय पं स खेड येथील श्रीम आशा नवगिरे, आशा नाईकडे, रेवननाथ ढाकणे,
सानिका घाटकर उपस्थित होते. या प्रसंगी आरोग्य सेवक नितिन भुसारी, प्रतिक गवारी, केतन घोलप, श्रीमती वैष्णवी पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. आशा कार्यकर्ती यांनी आपले दैनंदिन सेवा देतानाचे अनुभव आणि बळकटीकरण व्यक्त केले. तसेच त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यात आला. यावेळी सादरीकरण झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील उत्सहात झाली. उपस्थितांनी मोठी दाद दिली. आशा दिना निमित्त सर्वाना स्वादिष्ट सुग्रास स्नेहभोजन देण्यात आले. गटप्रवर्तक यांनी आभार वक्त केले.