जीवन शैलीपुणेब्रेकिंग न्यूज़मराठीव्यापार

पर्णकुटी आणि सह्याद्री हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने 30 महिलांना व्यवसाय स्टार्टअप किटचे वितरण

Spread the love

पुणे.  आर्थिक स्वावलंबन आणि कौशल्य विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पर्णकुटीने उपेक्षित समुदायातील महिलांना व्यवसाय स्टार्टअप किट वितरित केले, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधने मिळाली. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या सहयोगाने आयोजित या उपक्रमांतर्गत १० शिवणयंत्रे , ११ मेकअप किट आणि ९ ब्युटी पार्लर किटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट एकल माता, स्थलांतरित, अल्प उत्पन्न गटातील आणि एचआयव्ही+ महिलांना आधार देणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे होते. या किट्स त्यांच्या कौशल्यांनुसार तयार करण्यात आल्या असून, त्यांचा त्वरित उपयोग करून या महिलांना आर्थिक उत्पन्न मिळवणे व वाढवण्यासाठी होईल.
पर्णकुटीने यासोबतच अल्प उत्पन्न गटातील महिला, स्थलांतरित आणि एकल मातां अशा ६० महिलांना नेल आर्ट कोर्स, ऍडवान्सड हेअर कटिंग कोर्स व डिजिटल पोर्टफोलिओ बिल्डिंग या प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देखील दिले आहे.
या वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लोनटॅप कंपनीचे श्री. विराज आणि पर्णकुटीच्या संस्थापक श्रीमती स्नेहा भारती उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे समाजातील उपेक्षित घटकांना सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सहकार्याचा संदेश अधोरेखित झाला.
कार्यक्रमात बोलताना, श्रीमती स्नेहा भारती यांनी आर्थिक सशक्तीकरण आणि कौशल्य विकासाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी सांगितले, “पर्णकुटी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महिलांसाठी संधी निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. हे व्यवसाय स्टार्टअप किट म्हणजे केवळ साधने नाहीत, तर उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे.”
लोनटॅपचे श्री. विराज यांनी देखील वित्तीय संधी आणि उद्योजकतेवरील आपले विचार मांडले आणि लाभार्थ्यांना या किट्सचा प्रभावीपणे उपयोग करून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा सल्ला दिला.
लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एका एकल मातेला मिळालेल्या किटबद्दल बोलताना तिने सांगितले, “ही केवळ भेट नाही, तर माझ्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधार आहे.”
पर्णकुटी व्यावसायिक प्रशिक्षण आणि संसाधन वितरणाद्वारे महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी कार्यरत आहे. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या उदार मदतीमुळे, हा उपक्रम पर्णकुटीच्या शाश्वत परिवर्तनाच्या ध्येयात आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button