माऊली मंदिरात एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील भागवत एकादशी ( कामदा ) निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात कामदा एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर महिलांसह भाविकांची गर्दी झाली होती. इंद्रायणी नदी घाटावर एकादशी दिनी इंद्रायणी आरती हरिनाम गजरात झाली. स्वच्छता उपक्रम राबवित घाटावर जनजागृती करण्यात आली.
आळंदी मंदिरात भाविकांनी एकादशी दिनी गर्दी करीत रांगा लावून हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, मुख्य व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने सरकार, सेवक, कर्मचारी, मानकरी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी यांनी नियोजन करीत भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन सुलभ देण्यासाठी परिश्रम घेतले. आपापली काळजी घेऊन भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या. दुपारचा महानैवेद्य झाला . रात्री आरती झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. नरके यांनी मार्गदर्शन केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी परिश्रम पूर्वक काम पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून मुक्तता झाली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. मात्र दुचाकी वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दंडात्मक कारवाईने भाविकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. वाहन पार्किंग ची सोय प्रथम करून मग बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करावी. पार्किंग कुठे करायची यावर जनजागृती आणि राखीव पार्किंग जागा यावर कामकाज करून दंड वसूल व्हावा. केवळ दंड करून वाहतूक सुरळीत होणार नसल्याचे सांगत भाविकांनी नाराजी व्यक्त केली
आळंदीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती
येथील इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका उषाताई नरके, शालन होणावळे, कौसल्या देवरे, सुनंदा चव्हाण, शोभा कुलकर्णी, सरस्वती भागवत आदी पदाधिकारी यांचे सह महिला भाविक, वारकरी उपस्थित होते. इंद्रायणी आरती हरिनाम गजरात इंद्रायणी नदी घाटावर नदी घाटाची स्वच्छता करीत उत्साहात झाली.