आयुक्त – निर्णयांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा अधिकारी ते सेवक वर्ग असते..!
प्रशासनात लोकाभिमुख काम करण्याची सांघिक भावना (टिम वर्क) हवी. ⁃ माजी आयुक्त रमानाथ झा

पुणे . आयुक्त निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेस प्रशासन संबोधतात, मात्र यामध्ये लोकाभिमुख काम करण्याची सांघिक भावना (टिम वर्क) हवी, असे वक्तव्य पुणे महापालिकेचे माजी आयुक्त (आय ए एस) श्री रमानाथ झा यांनी पुणे महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात केले.
ते पुढे म्हणाले के अनेक वर्षे महापालिकेत काम करताना ऊत्तरदायीत्वाची सांघीक भावना उत्पन्न होते व आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आपण अधिकारी ते सेवकवर्ग करता, हेच प्रशासकीय कामाचे गमक आहे. माझ्या कारकिर्दीत झालेल्या कामांची आपण स्तुती केलीत, मात्र निर्णयांची अंमलबजावणी करणारे तुम्हीच असल्याने ते निर्णय फलद्रुप ठरल्याचे सांगून निवृत्त अधिकारी ते सेवकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सेवानिवृत्ती नंतर चे आयुष्यमान वाढत असल्याचे सांगून ते दर्जेदार व लोकोपयोगी पद्धतीने जगून समाजाचे देणे फेडणे हेच आपल्या हाती असल्याचे सांगितले.
⁃ या प्रसंगी पुणे मनपाचे माजी उपायुक्त व निवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष जयंत पवार, माजी अध्यक्ष संभाजी राजे भोसले,माजी कार्याध्यक्ष विठ्ठलराव शेटे सर ,ज्येष्ठ सल्लागार गोपाळदादा तिवारी, कामगार नेत्या मुक्ताताई मनोहर, माजी उपायुक्त नंदकुमार जगताप, कार्याध्यक्ष संजीव मोरे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक स्व भाई वैद्य यांच्या प्रतिमेस मानयवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुणे “महापालिका स्थानिक स्वराज्य (स्वायत्त) संस्था असुन “लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या संविघानिक कर्तव्यपुर्तीतुन चालते” असे प्रतिपादन संघटनेचे जेष्ठ सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “अधिकारी ते सेवक वर्ग हे प्रशासन असुन ‘लोकशाही’चा प्रथम स्तंभ असल्याने, या घटकाच्या संविधानीक हक्कांची पुर्तता होणे, यास संरक्षण व नैतिक बळ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मा. ‘रमानाथ झा यांच्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत’ मनपा सेवकांना न्याय मिळाला व अशा आयुक्तांच्या कारकिर्दीचे सर्वचजण स्मरण करतात असे उदगार कामगार नेत्या काॅ. मुक्ता मनोहर यांनी काढले. “पुणे मनपा सेवा निवृत्त संघटनेच्या पारदर्शक समाजिक कार्यास उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार” ही आमच्या कामास मिळालेली पावती असल्याचे गौरवोद्गार संघटनेचे अध्यक्ष जयंत पवार यांनी प्रस्ताविक भाषणात काढले.
या प्रसंगी संघटनेच्या परंपरे प्रमाणे ‘विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या’ सेवा निवृत्त सेवकांचे व कुटुंबियांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. (त्यांची नांवे वैशाली बर्गे,उषा सातव) पाहुण्यांचे स्वागत व सत्कार कार्याध्यक्ष संजीव मोरे व पदाधिकारी यांनी केले. सुत्र संचालन – शिल्पा देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन सरचिटणीस बापुसाहेब खलाटे यांनी केले.