मराठी

डिशटीव्ही वॉचोने OTT कंटेंटमध्ये केला नवा बदल – ‘FLIQS’ देणार कंटेंट क्रिएटर्सना नवी संधी

Spread the love

पुणे . डिश टीव्ही इंडिया लिमिटेडने डिजिटल कंटेंटच्या क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल उचलत ‘WATCHO’ अ‍ॅपमध्ये ‘FLIQS’ (फ्लिक्स ) हा खास डिजिटल कंटेंट विभाग सुरू केला आहे. WAVES 2025 मध्ये सादर झालेला ‘ फ्लिक्स ’ हा प्लॅटफॉर्म कंटेंट क्रिएटर्सना आपला कंटेंट लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यातून उत्पन्न मिळवण्याची संधी देणार आहे. हे क्रिएटर्ससाठी जणू स्वतःचं OTT अ‍ॅप असल्यासारखं आहे.

प्रेक्षकांना देखील फक्त ₹९ पासून कंटेंट पाहण्याची सुविधा, मोफत व्हिडीओ, तसेच प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय भाषांतील चित्रपट, वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्सचा भरपूर संग्रह एकाच अ‍ॅपमध्ये उपलब्ध असणार आहे. याशिवाय, आधुनिक आणि आकर्षक इंटरफेस, AI आधारित शिफारसी, आणि मल्टी-स्क्रीन सपोर्टमुळे FLIQS अनुभव अधिक वैयक्तिक आणि सुलभ असणार आहे.

मनोज डोभाल, मुख्य कार्यकारी संचालक, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, Dish TV India Ltd. म्हणाले,
“FLIQS च्या माध्यमातून, आम्ही OTT सेवा काय असू शकते याची नवी व्याख्या करण्यासाठी एक मोठं आणि धाडसाचं पाऊल उचललं आहे. हे फक्त आणखी एक कंटेंट लाँच नाही – हे आमच्या हेतूचं स्पष्ट विधान आहे. FLIQS ही निवडक, विशेष आणि नवी डिजिटल गोष्टी सांगणारी पुढची पिढी आहे, जी प्रेक्षकांच्या वेगळेपणाच्या आणि दर्जेदार कंटेंटच्या वाढत्या मागणीशी जुळून घेते. उद्योगात अनेक प्लॅटफॉर्म आले आहेत, पण त्यातील फारच थोडे काहीतरी वेगळं देतात. FLIQS ही पोकळी भरून काढेल – अनकथित कथा, ओरिजिनल प्रॉडक्शन आणि विशेष टायटल्स एकत्र आणतो, ते ही वैयक्तिक अनुभव आणि परवडणाऱ्या दरात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.”

मनोज डोभाल पुढे म्हणाले,”FLIQS भारतातील वाढणाऱ्या स्वतंत्र कथा सांगणाऱ्यांच्या समुदायाला एक प्रीमियम प्लॅटफॉर्म देईल, जिथे ते त्याचं काम दाखवू शकतात, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि उत्पन्नाची दारे उघडू शकतात — ज्यामुळे डिजिटल-प्रथम सर्जनशील उद्योजकतेसाठी Dish TV चं योगदान अधिक बळकट होतं जाणार आहे. हे केवळ डिशटीव्हीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय OTT क्षेत्रासाठीही एक मोठं पाऊल आहे.”

व्ही. के. गुप्ता, CTO आणि बिझनेस हेड, Watcho म्हणाले,”FLIQS हा प्रेक्षकांच्या वेगळेपणा, खासगीपणा आणि त्यांच्या मनोरंजनावर असलेल्या नियंत्रणाच्या गरजेसाठी आमचा उपाय आहे. हे फक्त एक अ‍ॅड-ऑन नाही, तर Watcho अ‍ॅपमधील एक परिवर्तन करणारा भाग आहे, जो अधिक स्मार्ट आणि प्रासंगिक अनुभव देईल. FLIQS मुळे Watcho OTT मार्केटमध्ये आपली भूमिका अधिक बळकट करतो आणि ही मोठ्या कंटेंट क्रांतीची सुरुवात आहे.”

डिशटीव्ही WATCHO अ‍ॅपमधील ‘FLIQS’ मुळे आता ते फक्त एक कंटेंट अ‍ॅग्रीगेटर राहिलेलं नाही, तर एक संपूर्ण डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म बनलं आहे. आता प्रेक्षकांना अधिक वैविध्यपूर्ण, दर्जेदार आणि खास कंटेंट पाहायला मिळणार आहे, आणि कंटेंट क्रिएटर्सना कमाईची आणि प्रसिद्धीची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button