‘द क्यु कल्चर करंडक’ खुली ९-बॉल पुल अजिंक्यपद स्पर्धा !!
रोहीत रावत, अभिजीत रानाडे, धवल गढवी, तन्मय जातकर उपांत्यपुर्व फेरीत !!

पुणे. पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटना (पीडीबीएसए) यांच्या मान्येतेखाली आणि क्यु कल्चर क्लब आणि अॅपेक्स् स्पोटर्स तर्फे आयोजित ‘द क्यु कल्चर करंडक’ खुली ९-बॉल पुल अजिंक्यपद स्पर्धेत रोहीत रावत, अभिजीत रानाडे, धवल गढवी आणि तन्मय जातकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
वानवडी येथील द क्यु कल्चर क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत स्नुकर क्लबच्या रोहीत रावत याने पुल क्लबच्या वैशाख श्रीराम याचा ७-१ असा पराभव केला. डेक्कन जिमखाना क्लबच्या अभिजीत रानाडे याने स्नुकर क्लबच्या सोनु मातंग याचा ७-६ असा संघर्षपूर्ण पराभव केला. क्यु क्लबच्या धवल गढवी याने स्नुकर क्लबच्या तहा खान याचा ७-४ असा पराभव उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. ब्रेक द स्नुकरच्या तन्मय जातकर याने मनोज गाडगीळ याचा ७-५ असा पराभव करून पुढील फेरी गाठली.
स्पर्धेचा निकालः मुख्य ड्रॉः उप-उपांत्यपुर्व फेरीः
रोहीत रावत (स्नुकर क्लब) वि.वि. वैशाख श्रीराम (पुल क्लब) ७-१;
अभिजीत रानाडे (डेक्कन जिमखाना) वि.वि. सोनु मातंग (स्नुकर क्लब) ७-६;
धवल गढवी (क्यु क्लब) वि.वि. तहा खान (स्नुकर क्लब) ७-४;
तन्मय जातकर (ब्रेक द स्नुकर) वि.वि. मनोज गाडगीळ (डेक्कन जिमखाना) ७-५;