
पुणे .रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच सामाजिक चळवळीचे नेते राहुल डंबाळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या वर्षीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार रिपब्लिकन पक्षाचे नेते सुभाष दादा त्रिभुवन यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
सदर प्रसंगी चरण त्रिभुवन, अॅड. प्रवीण पटेकर, किरण सोनवणे, प्रतीक डंबाळे, सेवानिवृत्त शिक्षण संचालक राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते
भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचे नियोजन, आंबेडकरी समुदायातील सामाजिक व राजकीय चळवळीतील योगदान तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर देशभर करत असलेल्या कार्याच्या अनुषंगाने डंबाळे यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्रिभुवन यांनी सांगितले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा कायम महत्वपूर्ण असल्याची भावना राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान व देशाची एकता व अखंडता सध्या धोक्यात आणली जात असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी व समुदायाने सर्वच वंचित व उपेक्षित वर्ग सोबत काम करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान याच वेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्यप्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांना महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी देखील हा पुरस्कार आपल्या रुपवते कुटुंबीयांनी आजवर केलेल्या समाजसेवेची फलित असल्याने या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.